जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bharat Gogawale : अंगावर आला तर सोडणार नाही, शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा इशारा

Bharat Gogawale : अंगावर आला तर सोडणार नाही, शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा इशारा

Bharat Gogawale : अंगावर आला तर सोडणार नाही, शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा इशारा

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण झाले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑगस्ट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान मागच्या तीन चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण झाले होते. यावेळी शिंदे गटातील नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी माध्यमांशी बोलताना थेट विरोधकांना इशारा दिला.

जाहिरात

भरत गोगावले म्हणाले कि, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका आमच्या अंगावर आला तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ. पिक्चर अभी बाकी है! हा फक्त ट्रेलर आहे असल्याचा थेट इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. ते आमच्या अंगावर आले नाही त्यांच्या अंगावर आम्ही गेलो होते. आम्हाला पाय लावायचा विचार केला तर सोडणार नाही असेही ते म्हणाले.  

हे ही वाचा :  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असे गोगावले म्हणाले. याचबरोबर शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा फक्त ट्रेलर होता अजून अख्खा सिनेमा बाकी आहे. विरोधकांनी 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा गेले काही दिवस प्रयत्न केला होता. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाला भिडले.

जाहिरात

कर नाही त्याला डर कशाला असंही भरत गोगावले म्हणाले. विधिमंडळाबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा गदारोळ सुरू झाला. सत्ताधारी आंदोलन करत असताना विरोधक त्यांच्या मध्ये गेले ज्यामुळे दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला.

हे ही वाचा :  शिवसेनेविरोधात शिंदे गट आता उतरणार मैदानात, मुंबई लढणार पहिली पोटनिवडणूक?

जाहिरात

दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. जशास तसं उत्तर देऊ, ते जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा आम्ही मध्ये कधी आलो नाही. विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात