मुंबई, 24 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर मोठी वाताहात झाली आहे. एकीकडे शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे, आता निवडणुकीतही उभे ठाकण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Andheri East in Mumbai) शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Shiv Sena MLA Ramesh Latke) यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा थेट सामना होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत रमेश लटके यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वच्या विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा भाजप शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच, इथून मुरजी पटेलांचं नावही चर्चेत आहे. असं झालं तर या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच शिवसेना आणि शिंदे गटाचा थेट सामना होऊ शकतो. मध्यंतरी औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने जास्त जागा जिंकून मुसंडी मारली होती. (संजय राऊतांसोबत मित्रही अडचणीत, किरीट सोमय्यांनी पोलिसांत केली तक्रार) मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं मे महिन्यात दुबईमध्ये निधन झालं होतं. रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला (dubai) फिरण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं होतं. रमेश लटके यांच्या निधनानंतर आता या ठिकाणी निवडणूक होणार आहे. (मरण पत्करू पण शरण जाणार नाही.. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..) दरम्यान, शिवसेनेनं घेतले निर्णय मोडीत काढण्याचा धडाका शिंदेंनी कायम ठेवला आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पक्षाविरोधात कारवाई केली म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हस्केंची हकालपट्टी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.