मुंबई, 27 सप्टेंबर: केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज ‘भारत बंद’ (bharat bandh) ची हाक दिली आहे. आत भारत बंदच्या हाकेला महाराष्ट्रभर देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतही आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विक्रोळीत भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून बाजूला केलं. बिंदू माधव चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विक्रोळीत भारत बंदला पाठिंबा pic.twitter.com/xS6jZnxMT8
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2021
पुण्यात मार्केट यार्ड बंद केंद्र सरकारच्या काळात कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या आवारातील सर्व संघटनेच्या वतीनं आज मार्केटयार्ड बंद ठेवण्यात आलं आहे. हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, दिलं ‘हे’ आश्वासन भारत बंदला भिवंडी, शहापूरमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीसह इतर पक्षांचा पाठिंबा भिवंडी, शहापूरमध्ये या बदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपसोबत, बहुजन विकास आघाडी, प्रहार संघटना यांनी आंदोलनात उपस्थित राहून सहभाग नोंदवला आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. तर शहापूरमध्ये बाजार पेठेतून रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
भारत बंदला भिवंडी, शहापूरमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीसह इतर पक्षांचा पाठिंबा pic.twitter.com/477SK7oKPi
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2021
जळगावमध्ये काँग्रेस पक्षाचे माजीखासदार डॉ. उल्लास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात जळगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. जळगावात भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्यानं भारत बंद आंदोलनात व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केलं. गाव शहरातील दुकाने सकाळपासून नेहमीप्रमाणे उघडल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी आजचा बंद यशस्वी करावा असे आवाहन केलं. दरम्यान दुकानं बंद न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशाराही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. हेही वाचा-
मोठी बातमी: इंदौर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, Watch Video लोणावळ्यातही आंदोलन शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे मागे घ्यावेत यासाठी काँग्रेसनं भारत बंदची घोषणा केली. काँग्रेसकडून लोणावळ्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील मुख्य कुमार चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. तर लोणावळ्यात काँग्रेसनं घोषणा केलेल्या भारत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.
सोलापूरमध्येही मोर्चाला सुरुवात सोलापुरात भारत बंदच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. शेकडो मोर्चेकऱ्यांसह कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. मात्र काही वेळातच माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हेही वाचा-
शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं औरंगाबाद भारत बंद आंदोलन भारतभर आज केंद्र सरकारच्या विरोधात विविध संघटना आंदोलन करत आहेत. औरंगाबादमध्येही डाव्या संघटनांच्या विविध आघाड्यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. शहरातील क्रांती चौक भागात आंदोलन सुरू आहे..ज्येष्ठ नेते भालचंद्र कांगो यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. नागपूर भारत बंद नागपूरच्या व्हॅरायटी चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, डावे पक्ष यांचे कृषी कायद्याच्या समर्थानात धरणे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आंदोलक जबरदस्तीने बाजारपेठ बंद करत आहे.