भगवानगडावर चोरी, बाबांच्या वापरातील रायफल गेली चोरीला

भगवानगडावर चोरी, बाबांच्या वापरातील रायफल गेली चोरीला

या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भगवान बाबा हे यांच्यावर लाखो लोकांची अपार श्रद्धा आहे.

  • Share this:

अहमदनगर, 27 फेब्रुवारी : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर चोरी झालीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील दोन बोअरचे रायफल चोरीला गेल्याचं उघड झालंय. पाथर्डी पोलीस  ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणीही केलीय. भगवानगडावर बाबांनी वापरलेल्या वस्तूचे प्रदर्शन लावले आहे त्यातील दोन बोअरची रायफल चोरी गेल्याचं गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनला प्राथमिक माहिती देण्यात आली असून पोलीस  भगवान गडावर आले आहेत. पोलिसांनी तिथल्या सी सी टीव्हीचं फुटेज तपासलं आहे. सदरची रायफल ही भगवान बाबा वापरत होते.

या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भगवान बाबा हे यांच्यावर लाखो लोकांची अपार श्रद्धा आहे. दसऱ्याला तिथे जास्त भाविक येतात. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे तिथे मेळावा घेत असत. नंतर पंकजा मुंडे आणि तिथल्या महंतांमध्ये वाद झाला आणि त्यांना मेळावा रद्द करावा लागला होता.

त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हा भगवानगड राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेण्याची प्रथा सुरू केली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या मतभेदांमुळे हा गड चर्चेत आला होता.

हेही वाचा...

मराठी दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरुणीचा VIDEO

भाजप खासदारच्या जात प्रमाणपत्राचा घोळ, धक्कादायक माहिती आली समोर

सुशीलकुमार शिंदे म्हणाले... नरेंद्र मोदींची अजूनही देशात हवा आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 05:02 PM IST

ताज्या बातम्या