भाजप खासदारच्या जात प्रमाणपत्राचा घोळ, धक्कादायक माहिती आली समोर

भाजप खासदारच्या जात प्रमाणपत्राचा घोळ, धक्कादायक माहिती आली समोर

त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर जात पडताळणी समितीने निर्णयही दिला होता.

  • Share this:

सोलापूर 27 फेब्रुवारी : भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबाबत वेगळीच माहिती समोर आलीय.प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला आहे असा अर्ज 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने करण्यात आलाय.

विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी या जात प्रमाणपत्र बाबत अंतिम सुनावणी पार पडली त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती

काय आहे प्रकरण?

त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून विजय मिळवणाऱ्या लिंगायत समाजातील आदरणीय गुरू असणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर जात पडताळणी समितीचा निर्णय आज आला आणि समितीने जयसिद्धेश्वर स्वामींच्या जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं.

4 हजार शाळांमधल्या 40 हजार शिक्षकांचा 10- 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले... नरेंद्र मोदींची अजूनही देशात हवा आहे

हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं.

जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले.

भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना सरकारचा दिलासा

सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे याठिकाणी इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही. जात पडताळणी समितीनं जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. या समितीच्या निर्णयाविरोधात स्वामी उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

First published: February 27, 2020, 4:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading