Home /News /maharashtra /

सुशीलकुमार शिंदे म्हणाले... नरेंद्र मोदींची अजूनही देशात हवा आहे

सुशीलकुमार शिंदे म्हणाले... नरेंद्र मोदींची अजूनही देशात हवा आहे

सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रातही दीर्घकाळ काम केलंय. काँग्रेस पक्षामध्येही त्यांनी मोठं मोठी पदं भुषवली होती.

सोलापूर 27 फेब्रुवारी : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. नरेंद्र मोदींची अजूनही देशात थोडी थोडी हवा आहे. त्यांनी माझ्यावरसुद्धा जादू केली होती. सुरुवातीच्या काळात ते चांगलं काम करतील असं वाटलं होतं, मात्र त्यांनी आर्थिक व्यवस्था बिघडवली, जाती जातीत तेढ सुरु केलंय. काँग्रेसच्या दक्षिण सोलापूर तालुका मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रातही दीर्घकाळ काम केलंय. काँग्रेस पक्षामध्येही त्यांनी मोठं मोठी पदं भुषवली होती. दीर्घकाळ त्यांच्याकडे उत्तर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असं कौतुक करणं याला महत्त्व प्राप्त झालंय. 2014 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते थोडे बाजूला पडले होते. त्यानंतर 2019मध्येही भाजपच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता. भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना सरकारचा दिलासा काँग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. दिल्लीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तर जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय. महाराष्ट्रातही भाजप विरोधात सगळेच पक्ष एकत्र झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला अडचणीचा सामना करावा लागतोय. हेही वाचा... इंदोरीकर महाराजांवर कारवाई नाही, आता जिल्हा शल्यचिकित्सकाला अंनिसची नोटिस पुण्यात भरधाव डंपरने बाईकस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Sushilkumar shinde

पुढील बातम्या