जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यसभेत आघाडीला धोबीपछाड देणारे फक्त फडणवीस नाहीत तर माजी शिवसैनिक! काँग्रेसचेही होते निष्ठावंत

राज्यसभेत आघाडीला धोबीपछाड देणारे फक्त फडणवीस नाहीत तर माजी शिवसैनिक! काँग्रेसचेही होते निष्ठावंत

राज्यसभेत आघाडीला धोबीपछाड देणारे फक्त फडणवीस नाहीत तर माजी शिवसैनिक! काँग्रेसचेही होते निष्ठावंत

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) भारतीय जनता पक्षाला (BJP) तिसरी जागा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे हे नेते एकेकाळी शिवसेनेचे (Shiv Sena) निष्ठावंत आणि काँग्रेसचे महत्त्वाचे रणनीतीकार होते. तो नेता सध्या भाजपच्या महाराष्ट्र शाखेचा उपाध्यक्ष आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून : महाविकास आघाडीकडे बहुमत असताना भारतीय जनता पक्षाने (BJP) धोबीपछाड देत राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर विजय मिळवला आहे. हा विजय आघाडीच्या (MVA) चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपच्या या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना समजले जात असेल तरी यापाठीमागे पूर्वश्रमीचा शिवसैनिक आहे. आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) असं या व्यक्तीचं नाव असून ते फडणवीस यांच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. आशिष, सध्या भाजपच्या महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष आहेत, यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षे येथे राहिल्यानंतर त्यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत त्यांनी सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हाताखाली काम केले, जे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योगमंत्री पद सांभाळत आहेत. ते शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. सहाव्या राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या मतदानात भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीसाठी आमची रणनीती अतिशय सोपी होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना आम्ही सर्वाधिक 48 मते दिली. देवेंद्र फडणवीस यांनी आशिषची योजना चांगल्या पद्धतीने राबवली नेते पुढे म्हणाले, आमच्या सर्व आमदारांनी तिसरे उमेदवार असलेल्या महाडिक यांना दुसरी पसंती दिली. हे सर्व आशिष कुलकर्णी यांच्या योजनेनुसार घडले, ज्याला भाजप निरीक्षक अश्विनी वैष्णव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम रूप दिले. गोयल आणि बोंडे यांना 48-48 मते मिळाली, म्हणजे 4800 गुण. दुसऱ्या पसंतीची मते महाडिक यांच्याकडे वर्ग करण्यात आली. भाजपला एकूण 106 आमदारांची मते मिळाली. राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव, सोनिया गांधींचा असा आहे प्लॅन? याशिवाय 8 अपक्ष आणि इतर 9 आमदारांच्या मतांचीही त्यात भर पडल्याने धनंजय महाडिक यांना एकूण 4156 गुण मिळाले. आशिष कुलकर्णींच्या या रणनीतीला देवेंद्र फडणवीस यांनी आणखी धार दिल्याचे भाजपचे नेते सांगतात. फडणवीस आणि वैष्णव यांच्याशिवाय कोणालाही या योजनेची माहिती नव्हती, असे भाजपच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे. अपक्ष आमदारांसह अन्य छोट्या पक्षांना सोबत घेण्याचे काम फडणवीस यांनीच केले. आशिष यांची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत दीर्घ राजकीय खेळी आशिष कुलकर्णी यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेताच त्यांना बाजूला केले होते. नारायण राणे यांच्याशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते, जे स्वतः उद्धव यांच्यासोबत काम करणे कठीण होऊन काँग्रेसकडे वळले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 6 लोकसभा जागा जिंकण्याची जबाबदारी आशिष कुलकर्णी यांच्यावर सोपवली होती. त्यांनी पक्षाला 6 जागांवर विजय मिळवून दिला. ‘पुतण्याचं अयोध्येत स्वागत, पण काका राज ठाकरेंना नो एंट्रीच’ बृजभूषण सिंह स्पष्टच बोलले आशिष यांच्या कौशल्याची सोनिया गांधींनी घेतली होती दखल त्यानंतर त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या रणनीतीच्या जोरावर आशिष यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यांचे हे कौशल्य पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना त्यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यासाठी दिल्लीला बोलावले होते. आशिष कुलकर्णी यांनी 2017 मध्ये काँग्रेस सोडली. काही काळ ते राजकारणापासून दूर राहिले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात