मुंबई, 13 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचं नाव आजपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेकवेळा पुढे आलं. पण वेळोवेळी शरद पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे नकार देऊन आपल्या इच्छेवर पाणी फेरलं. पण त्यांच्याच नावाची चर्चा कायम राहिली आहे. आता राष्ट्रपतिपदाची निवडणूक (presidential election 2022) होत आहे, त्यासाठी विरोधी गटातून शरद पवार यांचे नाव समोर येत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) यांनीही पवारांचं नाव सुचवले असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रपतिपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार जर विरोधी पक्षाचे उमेदवार होणार असतील, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यामुळे विरोधी पक्षाची वाट आणखी सोपी होईल, असा सल्ला दिला. अहमदनगर हायवेवर सापडला मंचक पवारांचा मृतदेह;1 कोटींच्या विम्यासाठी पत्नीचा प्लान तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्हावे, अशी विनंती केली होती. पण, शरद पवार हे सहसा कोणताही धोका पत्कारून असा निर्णय लगेच घेणार नाही. जर शरद पवार हे विरोधी गटातून उमेदवार म्हणून जर समोर आले तर त्यांना ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आणि स्टॅलिन, हेमंत सोरेन यांच्यासह सर्वच स्तरातील नेते सहज पाठिंबा देतील. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास एकवेळेस नकार देतील पण शरद पवार यांना लगेच पाठिंबा दर्शवतील. International Yoga Day 2022: गायक व्हायचंय? सुरेल आवाजासाठी करा ‘हा’ योगाभ्यास ) तर दुसरीकडे, वाईएसआर आणि बीजू जनता जल हे काँग्रेसच्या राजकीय रणनीतीला सुरूंग लावण्याची जास्त शक्यता आहे. जर शरद पवार यांना विरोधी आघाडीकडून जर उमेदवारी देण्यात आली तर या दोन्ही पक्षांसोबत संवाद साधणे आणखी सोपे होणार आहे. पण अजूनही बीजू जनता दल आणि वाईएसआर हे काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक असल्याचे चित्र आहे. पण, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी होकार कळवता की नकार कळवता, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.