बीड, 24 सप्टेंबर : संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी 23 सप्टेंबर 2022 हा दिवस ऐतिहासिक होता. या दिवशी आष्टी ते अहमदनगर ही पॅसेंजर रेल्वे सुरू झाली. बीड जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता ही रेल्वे लवकरच बीड शहरापर्यंत धावेल आणि शहरातील उद्योगांना यामुळे चालना मिळेल अशी आशा बीडकरांना आहे. तब्बल 95 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे अखेर सुरू झाली आहे.
1927 ते 2022
या रेल्वे मार्गाची पाहणी 1927 साली ब्रिटीशांनी सर्वप्रथम केली होती. त्यावेळी बीड जिल्हा निजामाच्या ताब्यात होता. त्यानंतर 1948 साली बीड जिल्ह्यासह मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाड्यात भारताचे विलिनीकरण झाले. स्वातंत्र्यानंतर सुरूवातीच्या काळात नगर-बीड रेल्वे मार्गावर चर्चा होत असे पण, रेल्वे मार्गाचे काम काही सुरू झाले नाही.
महाराष्ट्रात 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बीडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या मार्गावर रेल्वे मार्ग उभारण्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी बीड दौऱ्यात घोषणा केली पण त्यानंतरही बीडकरांची प्रतीक्षा संपली नाही.
कोरोनात गेली इंजिनिअरची नोकरी, आता फुड स्टॉलमधून करतोय लाखोंची कमाई! Video
1980 च्या दशकात तत्कालीन खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी रेल्वेच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याकडे त्यांनी हा प्रश्न मांडला अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार दिलीप खिस्ती यांनी सांगितली. 'तत्कालीन सत्ताधाऱ्यांची मराठवाड्याकडे आणि बीड जिल्ह्याकडे बघण्याची अनास्था असल्यानं या रेल्वे मार्गाला उशीर झाला,' असा दावा खिस्ती यांनी केला.
बीड जिल्ह्यातील शेजारच्या लातूरचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीड रेल्वेचा अर्धा खर्च राज्य सरकाराच्या तिजोरीतून करण्याची तयारी दाखवली त्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थानं वेग आला. सध्याचा आष्टी रेल्वे मार्ग हा व्यावसायिक दृष्ट्या हिताचा नाही, असे सांगितले गेले. पण बीड जिल्ह्यातील नागरिकंची इच्छा असल्यानं हा मार्ग आता आष्टीपर्यंत आला आहे,' असेही खिस्ती यांनी सांगितले.
आष्टी ते परळी या 195 किलोमीटर अंतराचे आणखीन काम अद्याप बाकी आहे. पुढील भागातील काही ठिकाणी भू संपादनाचे कामही अद्याप बाकी आहे, त्यामुळे आता आष्टी ते बीड आणि बीड ते परळी हा रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
कॉलेजनं 11 महिन्यातच उभारले जंगल, 'बीड पॅटर्न'ची राज्यभर होणार अंमलबजावणी! VIDEO
कधी सुटणार रेल्वे?
अहमदनगर ते आष्टी ही रेल्वे नगरहून सकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आष्टी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. त्यानंतर आष्टीहून सकाळी 11 वाजता ही रेल्वे सुटणार असून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नगरला पोहोचेल. रविवार वगळता दररोज ही रेल्वे सुरु असेल. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Indian railway