मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट

Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट

X
बीड

बीड जिल्ह्यात बहुप्रतीक्षित रेल्वे अखेर धावली आहे. रेल्वेमुळे आष्टी ते अहमदनगर प्रवास सोपा झाला आहे.

बीड जिल्ह्यात बहुप्रतीक्षित रेल्वे अखेर धावली आहे. रेल्वेमुळे आष्टी ते अहमदनगर प्रवास सोपा झाला आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  बीड, 24 सप्टेंबर : मागील अनेक वर्षांपासूनचे बीड जिल्हावासियांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास गेलं आहे. अहमदनगर ते आष्टी मार्गावर रेल्वे अखेर धावली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेची बीडकर आतुरतेने वाट पाहत होते. रेल्वेमुळे आष्टी ते अहमदनगर प्रवास सोपा झाला आहे. बहुप्रतीक्षित रेल्वेबद्दल सामान्य बीडकरांच्या काय आहेत प्रतिक्रिया पाहूया या रिपोर्ट मधून.

  बीड जिल्ह्यात रेल्वे आली. खूप आनंद झाला. अहमदनगर ते आष्टी पर्यंत रेल्वे धावली आहे. रेल्वे आल्यामुळे उद्योगाला चालना मिळेल. मात्र ही रेल्वे जिल्ह्यात येण्यासाठी 75 वर्ष लागली. येत्या काही वर्षात ही रेल्वे बीड, परळीपर्यंत पोहोचली पाहिजे, असे नागरिक प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

  आम्हाला सध्या तरी फायदा नाही

  बीड आणि परळी पर्यंत अद्याप रेल्वे नाही. येथे रेल्वे येणे आवश्यक आहे. आष्टीला जायचं असेल तर 90 किलोमीटरचे अंतर आहे. परळी येथील अंतर देखील 90 किलोमीटर आहे. त्यामुळे या रेल्वेचा आम्हाला सध्या तरी फायदा नसल्याचे नागरिक अभिजित ठाकूर यांनी सांगितले.

  शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा

  रेल्वे हा बीड येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला होता. अखेर अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग तयार झाला असून काल पहिली रेल्वे आष्टी येथून धावली. सध्या हे 66 किलोमीटर अंतर आहे. मात्र या रेल्वेचा शेतकरी, व्यापाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. बीडमध्ये रेल्वे पाहून सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

  कॉलेजनं 11 महिन्यातच उभारले जंगल, 'बीड पॅटर्न'ची राज्यभर होणार अंमलबजावणी! VIDEO

  रविवार वगळता दररोज सेवा

  अहमदनगर ते आष्टी रेल्वे नगरहून सकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी सुटेल. आष्टी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. दुसरीकडे ही रेल्वे सकाळी 11 वाजता आष्टीवरून सुटून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नगरला पोहोचेल. रविवार वगळता दररोज ही रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

  आष्टी ते नगर  40 रुपयात प्रवास

  आष्टी ते नगर  40 रुपये, आष्टी ते नारायणडोह 35 रुपये, आष्टी ते कडा 30 रुपये, आष्टी ते धानोरा 30 रुपये, आष्टी ते सोलापुरवाडी 30 रुपये, आष्टी ते लोणी 30 रुपये असा तिकिटाचा दर असणार आहे.

  Beed : नगर-आष्टी रेल्वे सुरू होण्यासाठी 95 वर्ष का लागले? पाहा Inside Story, Video

  आष्टी तालुक्यातील गावाला होणार फायदा

  आष्टीसह आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवरील पाथर्डी, जामखेड,  कर्जत, पाटोदा, व शिरूर तालुक्यातील नागरिकांना पुणे  मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. व्यापारी वर्गाला मुंबई  पुणे,दिल्ली इंदौर, सुरत आदी ठिकाणाहून माल आणण्यासाठीही या रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे.  

  रेल्वेचा थांबा

  आष्टी अहमदनगर या रेल्वे प्रवासादरम्यान पहिला थांबा नारायणडोह आहे. यानंतर लोणी, सय्यदमीर,  सोलापूरवाडी, धानोरा कडा, व आष्टी स्थानकांवर रेल्वेचा थांबा असणार आहे. दरम्यान प्रवाशांसाठी तिकीट विक्रीगृह रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. आष्टी तालुक्यातील पाच व नगर जिल्ह्यातील एका स्थानकावर तिकीट विक्रीगृह सुरू झाली आहे. 

  First published:

  Tags: Beed, Beed news, Railway, बीड, बीडकर, रेल्वे