जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धनुभाऊ जोमात, पंकजाताईंना मोठा धक्का; परळीत राष्ट्रवादी पुन्हा!

धनुभाऊ जोमात, पंकजाताईंना मोठा धक्का; परळीत राष्ट्रवादी पुन्हा!

परळी बाजार समितीमध्ये धनंजय मुंडेंचा विजय

परळी बाजार समितीमध्ये धनंजय मुंडेंचा विजय

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अंबाजोगाईनंतर आता परळीमध्ये देखील पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 29 एप्रिल : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अंबाजोगाईनंतर आता परळी  वैजनाथ बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. 18 पैकी 11 जागांवर मविआचं पॅनल विजयी झालं आहे. तर सात जागांचा निकाल लागलं अद्याप बाकी आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावारण चांगलचं तापलं होतं. मुंडे बहिण भाऊ आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. आज अखेर निकाल हाती आला असून, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का दिलाय. परळी बाजार समिती निवडणुकीत एकूण 18 उमेदवार उभे होते. आज या बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर अद्याप सात जागांचा निकाल बाकी आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान दुसरीकडे आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआनं बाजी मारली आहे. तर  तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का माणला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात