जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे' राऊतांचा नोटबंदीवरुन घणाघात

'चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे' राऊतांचा नोटबंदीवरुन घणाघात

संजय राऊत

संजय राऊत

नोटाबंदीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 20 मे : चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नोटाबंदीवरुन केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, व्यापार लहान उद्योग बंद पडले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यावेळी शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर ती सगळीच नाती तुटली. ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती, अशी खंत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, ही अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी पुन्हा केलेल्या नोटाबंदीवरही राऊत यांनी टीका केली. महाप्रबोधन यात्रेनिमित्त संजय राऊत बीडमध्ये आले असता त्यांना माध्यमांशी संवाद साधला. वाचा - आशिष देशमुख भाजपकडून विधानसभा लढवणार? फडणवीस, बावनकुळेंनी घेतली भेट काय म्हणाले संजय राऊत? लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण इथेच नाहीतर सर्व ठिकाणी येते, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात क्राईसेस निर्माण होतात, त्या प्रत्येक वेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते. विशेषतः पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिवसेना भाजप युतीमध्ये होतो. एकत्र राहिलो कधीकाळी मतभेद झाले असतील. भारतीय जनता पक्षामध्ये हे सर्व मतभेद दुरुस्त करणारे जे मंडळ होतं त्यात गोपीनाथराव मुंडे होते. एक अत्यंत जिंदादिल, दिलदार दिलखुलास, असं राजकारणातलं व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती रहावी आणि ती अखंड टिकावी, हे त्यांचं कायम स्वप्न होतं. जाहीरपणे बैठकामध्ये त्यांनी ती भूमिका मांडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती त्यांची श्रद्धा होती. ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यानंतर ती सगळीच नाती तुटली त्यामुळे त्यांची आठवण येते ते असते तर कदाचित युती तुटली नसती, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

News18लोकमत
News18लोकमत

अटलजी, आडवाणींचा भाजप आता राहिला नाही : राऊत पुढे ते म्हणाले, की जो आम्ही पाहिला तो भारतीय जनता पक्ष राहिला नाही. महाराष्ट्रातला आणि देशातला अटलजी आणि आडवाणी यांचा केंद्रातला आणि महाराष्ट्रातला गोपीनाथ मुंडे यांचा भाजप राहिला नाही. वारसा असतो मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व, त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांची बरोबरीही कोणी करू शकत नाही. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे राजकारणात वावरायाचे त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली, त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , RBI , sanjay raut
  • First Published :
जाहिरात
जाहिरात