जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आशिष देशमुख भाजपकडून विधानसभा लढवणार? फडणवीस, बावनकुळेंनी घेतली भेट

आशिष देशमुख भाजपकडून विधानसभा लढवणार? फडणवीस, बावनकुळेंनी घेतली भेट

फडणवीसांनी घेतली देशमुखांची भेट

फडणवीसांनी घेतली देशमुखांची भेट

आज देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 20 मे : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आशिष देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या तिघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. चर्चेचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी आशिष देशमुख हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे आशिष देशमुख यांनी या सर्व शक्यतांचं खंडण केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नेमकं काय म्हणाले देशमुख?  आशिष देशमुख यांच्याकडून आजच्या भेटीवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आजच्या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. राजकारणापलिकडे फडणवीस आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. फडणवीस हे चांगलं काम करणारे नेते आहेत. त्यांच्या कामाचं मी कौतुक करतो. अमित शाह हे देशाचे कार्यक्षम गृहमंत्री आहेत, अशा शब्दात देशमुख यांनी फडणवीस आणि शाह यांचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात