मराठी बातम्या /बातम्या /Viral /'माझं लग्न लावून द्या' तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र, कारण वाचून अधिकारी चक्रावले

'माझं लग्न लावून द्या' तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र, कारण वाचून अधिकारी चक्रावले

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जिल्हाधिकार्‍यांनी त्याच्या आई-वडिलांचं लग्नासाठी मन वळवावं, अशी विनंती तरुणाने केली.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  शिवपुरी, 09 फेब्रुवारी : लग्न दोन कुटुंबांचं मीलन असतं, असं म्हटलं जातं. पण अलीकडेच समोर आलेल्या प्रकरणानंतर लग्न हे आपल्या कुटुंबापासून सुटका करून घेण्याचा पर्याय असल्याचं दिसत आहे. आपल्या मद्यपी भावाला कंटाळलेल्या एका तरुणानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्याची व्यथा मांडली आहे. हे पत्र सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

  मध्य प्रदेशमधील शिवपुरीत जिल्हाधिकार्‍यांच्या नावे आलेला तरुणाचा अर्ज वाचून अधिकारीही चक्रावले आहेत. 'माझं लग्न लावून द्या, सात जन्म मी तुम्हाला माझ्या वडिलांपेक्षा जास्त मानेन,' अशी विनंती या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मात्र, ज्यावेळी हा तरुण जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी पोहोचला, त्यावेळी जिल्हाधिकारी तेथे उपस्थित नव्हते. अन्य अधिकाऱ्यांनी तरुणाकडून अर्ज घेतला असून, तुमचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, असं आश्वासन तरुणाला देण्यात आलं आहे.

  हे ही पाहा : शरीर संबंधासाठी नववधूचा नकार, कारण समोर येताच सरकली नवरदेवाच्या पाया खालची जमीन

  शिवपुरीच्या लुधावली इथं राहणाऱ्या जीतू नागरने मंगळवारी झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्याच्या लग्नाची मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी त्याच्या आई-वडिलांचं लग्नासाठी मन वळवावं, अशी विनंती तरुणाने केली. असं झाल्यास सात जन्म मी आपल्या वडिलांपेक्षाही जास्त मान जिल्हाधिकाऱ्यांना देईन, असं त्याने म्हटलं. हा तरुण कचरा गोदामात काम करतो.

  लग्न करण्याचं जीतूने दिलेलं कारण काय?

  जीतू नागरने सांगितलं की, त्याचा मोठा भाऊ विवाहित असून त्याला चार मुलं आहेत. मोठ्या भावाला सुरुवातीपासूनच दारूचं व्यसन असून, तो रोज दारू पिऊन घरी येतो व त्याच्याशी भांडण करतो, त्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांबरोबर राहायचं नाही. त्याच्या लग्न करून कुटुंबापासून वेगळं व्हायचं आहे आणि शांततेत आयुष्य जगायचं आहे.

  जीतूने अर्जात काय म्हटलं आहे?

  ‘कलेक्टर साहेब, तुम्ही माझ्यासाठी फक्त कलेक्टर नसून, माझे वडील आहात. जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर मला तुमच्याशी भेटून बोलायचं आहे. तुम्ही माझे आई-वडील आहात आणि तुम्हीच माझे देव आहात. माझ्या सात जन्मापर्यंत मी तुम्हाला माझ्या वडिलांपेक्षा जास्त मानेन. तुम्ही माझ्या आई-वडिलांची माझ्या लग्नासाठी मनधरणी करा. तुमचाच जीतू नागर" असं त्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात लिहिलं आहे.

  दरम्यान, जीतूच्या या पत्राला आता जिल्हाधिकारी उत्तर देतात की नाही आणि उत्तर दिल्यास काय देतील, या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकंदरीतच सध्या जीतूने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या या पत्राची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

  First published:

  Tags: Local18, Shocking, Social media, Top trending, Viral