बीड, 13 डिसेंबर : सरकारी काम आणि बारा महिने थांब असे आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते. शासनाच्या स्तरावर जिल्ह्यामध्ये अनेक नागरिक त्यांच्या समस्या किंवा तक्रारी सरकारी दरबारी मांडत असतात. काही पत्रव्यवहार करतात तर काही स्वतः निवेदन देखील आणून देतात. मात्र, आता आपले सरकार या ॲपच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांच्या तक्रारी निकाली निघाल्या आहेत. 2015 पासून ते डिसेंबर 2022 पर्यंत बीड जिल्ह्यात जवळपास 6 हजार तक्रारींची नोंद झाली आहे. राज्य सरकारने 26 जानेवारी 2015 रोजी आपले सरकार हे पोर्टल कार्यरत केले. पोर्टलच्या माध्यमातून 21 दिवसाच्या आत नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याची मर्यादा देखील दिली. त्यामुळे सर्वसामान्याला लवकरात लवकर न्याय देखील मिळतोय. आपले सरकार हे ॲप कार्यरत झाले तेव्हापासून सामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारी सरकार दरबारी मांडण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज राहिली नाही. 2015 पासून ते डिसेंबर 2022 पर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सहा हजार 522 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर यामधील 6466 तक्रारी निकाली देखील काढण्यात आल्या आहेत तर 56 तक्रारी प्रलंबित आहेत. तेलबिया पिकांची लागवड घटली, सूर्यफूल नामशेष होण्याच्या मार्गावर कुठल्या आहेत सर्वाधिक तक्रारी फेरफार नोंदणी. नगर परिषद विषयी तक्रारी. नागरिकांच्या समस्या, उप प्रादेशिक वाहन कार्यालय विषयी, जमीन अधिग्रहण व त्याचा मोबदला यासह अनेक विषयांच्या तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या आहेत. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित नोडल अधिकारी व त्यांच्या विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची तक्रार ऑनलाईन पद्धतीने पाठवून सात दिवसात त्याची माहिती मागून घेतात. ती तक्रार 21 दिवसात निकाली काढून संबंधित तक्रारदाराला ऑनलाइन पद्धतीने कळविले जाते. 5 कोटींची उलाढाल ठप्प!, कधी सुरू होणार जनावरांचा बाजार ? Video अशी करता येईल तक्रार www.apple sarkar.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा प्ले स्टोरमध्ये जाऊन आपले सरकार ॲप डाउनलोड करून सुरुवातीला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून लॉगिन करावे. त्यानंतर तक्रार निवारण यावर क्लिक करावे व त्यानंतर कोणत्या विभागाची तक्रार आहे त्या विभागावर क्लिक करावे, तेथे विचारण्यात आलेली माहिती भरून तक्रार नोंद करावी.