सांगली, 12 डिसेंबर : सांगली जिल्ह्यात लम्पी त्वचारोग आजाराने हजारो जनावरे दगावली आहेत. तर आजही शेकडो जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे बाजार बंद आहेत. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मिरज आणि आटपाडीमध्ये जनावरांच्या बाजाराची कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. यात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे मोठे नुकसान होत आहे. बाजार पुन्हा कधी सुरू होईल, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रभाव वाढत चालल्याने जनावरांचे आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांत लम्पीचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, मिरज, कवठेमहांकाळ, जत, माडग्याळ येथील शेळ्यामेंढ्यांचे बाजार सुरू आहेत. मिरजेत बुधवारी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरला जातो, त्यापाठोपाठ आटपाडीमध्ये शुक्रवारी बाजार भरतो. मात्र मागील दोन महिन्यापासून हे बाजार बंद आहेत. बाजार समितीचे उत्पन्न बंद जिल्ह्यात लम्पी स्कीनच्या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर 10 ऑक्टोबर 2022 पासून तातडीने हा जनावरांचा बाजार बंद केला. अद्याप बाजार सुरू करण्याचे आदेश आले नसल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मिरजेच्या एका बाजारात वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल होते. सरासरी दर बुधवारी होणारी 35 ते 40 लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यापाठोपाठ आटपाडीतील बाजारातही 15 ते 20 लाखापर्यंत उलाढाल होते. ‘या’ कारणामुळं हिवाळ्यात वाढले बाजरी आणि ज्वारीचे भाव, पाहा video दोन महिन्यात मोठ्या जनावरांच्या बाजारातील तब्बल 5 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी बाजार समित्यांना मिळणारे उत्पन्न बंद आहे. मिरज उपबाजार समितीला आठवडी बाजारातून सुमारे 5 लाख तर आटपाडी बाजार समितीला 2 लाखाचे उत्पन्न मिळते. परंतु, बाजार बंदने उत्पन्न बुडाले आहे. मिरजेत 3.60 कोटीची उलाढाल थांबली सांगलीत दर बुधवारी जनावरांचा बाजार भरतो. दर आठवड्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सरासरी 3 कोटी 60 लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे. जनावरांचे प्रवेश शुल्क, वाहन कर, पानपट्टी, चहा टपऱ्यातून मिळणारे 4 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. Video : कोयता सोडून हाती घेतली लेखणी, ऊसतोड मजुराचा मुलगा बनला कवी! कधी सुरू होणार बाजार? जोपर्यंत प्रादुर्भाव कमी होणार नाही तोपर्यंत बाजार भरवणे धोक्याचं आहे. सांगली जिल्हा वगळता काही ठिकाणी बाजार सुरू झाले आहेत तिथे म्हशींची खरेदी विक्री होत आहे.परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकही बाजार म्हशीसाठी व गायीसाठी सुरू झालेली नाही. रोग लवकरच कंट्रोल झाला आहे महिन्याभरात बाजार सुरू होतील असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.