बीड, 3 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं होतं. अखरे या भेटीवर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी वादळाची लेक आहे. वादळ येणार होते, मात्र त्याची दिशा बदलली असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं? मुंडे साहेबांचं जीवन वादळी होतं आणि मी वादळाची लेक आहे. आता इथे वादळ येणार होतं त्याचं डायरेक्शन बदललं आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे नेमकी वादळाची दिशा कोणी बदलली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या चर्चेनंतर वादळाची दिशा बदलली का? असा देखील सूर राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.
एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या चर्चेनंतर वादळाची दिशा बदलली का असा देखील सूर राजकीय वर्तुळात काढला जात आहे, यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?#PankajaMunde #BJP #BeedNews #Parali #PankajaTai #News18Lokmat pic.twitter.com/fNKrDOS1ZP
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2023
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, तीन जून हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी आज कोणत्याही राजकीय नेत्याला इथो निमंत्रीत केलं नव्हतं. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या निष्पाप लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. नाथाभाऊ यांचं मुंडेसाहेबांवर प्रेम आहे. म्हणून नाथाभाऊ भेटीसाठी आले. ते कोरोना काळात येऊ शकले नव्हेत. ते मुंडेसाहेबांचे सहकारी होते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी जे काही बोलेल ते आज तीन वाजता बोलेल असंही पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.