बीड, 25 फेब्रुवारी : केंद्रात आणि राज्यात सरकार असताना रेल्वे डब्याचा प्रकल्प लातूरला गेला कसा? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना केला आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा या गावी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी परळी मतदारसंघातील विकासावरून धनंजय मुंडेंनी घणाघाती टीका केली. (Uddhav Thackeray : येत्या दोन दिवसांत पुन्हा राजकीय भूकंप? 20 आमदार… उदय सामंतांनी सांगितली आतली गोष्ट) केंद्रामध्ये तुमचेच सरकार आहे, राज्यात सुद्धा तुमचे सरकार आहे, असं असताना रेल्वे डब्याचा प्रकल्प लातूरला गेला? सिरसाळ्यात विकासाची एक रुपयांची साधी एक वीट तरी आणली का? म्हणत नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला टोला लगावला. ( औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? एमआयएमचं सरकारला थेट आव्हान ) ‘मी विकास करताना विरोधक म्हणून बघत नाही. विकास करताना मी माझ्या घरावर तुळशी पत्र ठेऊन काम करत आहे, असे जीवनामध्ये राजकारण केले एखाद्याला विरोध केला असेल तो विरोध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केला असेल पण राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी कोणाच्या पाठीत वार केला नाही, ज्याला कोणाला वर करायचा असेल तर छातीत वर झेलण्याची माझी तयारी आहे, पाठीवर वार करायचं काही जणांनी बंद करावे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांची कान टोचले. तसंच, मुंबईच्या वरळीला आर्थिक दृष्ट्या महत्व आहे. तेवढंच परळीला सुद्धा आर्थिक दृष्ट्या सबळ करू. परळी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये सामिल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रभू वैद्यनाथा ऐवजी झारखंड येथील बैद्यनाथ धामला केंद्र सरकारने ज्योतिर्लिंगाचा दर्जा दिला. हे बरोबर नाही. हे कोणामुळे गेले यावर मला आता बोलायचे नाही, असं म्हणत नाव न घेता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.