मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? एमआयएमचं सरकारला थेट आव्हान

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? एमआयएमचं सरकारला थेट आव्हान

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर झाल्यानंतर एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे.

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर झाल्यानंतर एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे.

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर झाल्यानंतर एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 24 फेब्रुवारी : औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीय. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असं असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमने टीका केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देत थेट आव्हानाची भाषा केली आहे, त्यामुळे या मुद्द्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलिल?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना जलिल म्हणाले, 'औरंगाबाद आमचं शहर होतं आणि आहे. आता औरंगाबादमध्ये आमच्या शक्तीचं प्रदर्शन बघा. आमच्या प्रिय शहरासाठी आम्ही मोर्चा काढणार. औरंगाबादकरांनो शहरांच्या नावाचं राजकारण करणाऱ्या या शक्तींचा (भाजप) पराभव करण्यासाठी तयार व्हा. आम्ही याचा निषेध नोंदवतो, आम्ही लढू,' असं आक्रमक ट्वीट इम्तियाज जलिल यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवरही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीसाहेब औरंगाबाद आमचं शहर आहे, तुमचं नाही, असं ट्वीट इम्तियाज जलिल यांनी केलं आहे.

मुख्य म्हणजे इम्तियाज जलिल यांच्या या ट्वीटला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही रिट्विट करून इम्तियाज जलिल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

First published:
top videos