मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara 2022: तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे होणार दहन, पाहा Video

Dasara 2022: तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे होणार दहन, पाहा Video

X
रावण

रावण दहनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे दहन होणार आहे.

रावण दहनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे दहन होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 5 ऑक्टोबर : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी दसरा हा एक सण आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावण दहन आणि शस्त्र पूजा केली जाते. बीडमध्ये देखील रावण दहनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे दहन होणार आहे.

10 दिवसांत बनवला रावण

खंडेश्वरी मंदिर बीड वासियांचे ग्रामदैवत आहे. या मंदिर परिसरात शारदीय नवरात्र महोत्सव सीमोल्लंघनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे. रावण बनवण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला आहे. यामध्ये मंदिराचे माता सेवक, मंदिर सदस्यांनी मेहनत घेऊन उत्सवाची तयारी केली आहे. 

सजवण्यासाठी 100 मीटर कपडा 

रावण बनवण्यासाठी प्रामुख्याने कसपण, पालापाचोळा, सरमठाचा वापर करण्यात आला आहे. रावण तयार करण्यासाठी जवळपास 80 हजार रुपये इतका खर्च आला आहे. दहनावेळी आकर्षक असे फटाके आतिषबाजीची व्यवस्था देखील करण्यात आली असून त्यासाठी 70 हजारांचा खर्च आला आहे. लोखंडी अँगलचा बेस देत रावण तयार करण्यात आला आहे. या मोठ्या रावणाचे वजन जवळपास एक टन आहे. मुखवटे फायबरचे असून रावणाला सजवण्यासाठी 100 मीटर कपडा लागला आहे.

Dasara 2022 : दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय? आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व?

आतिषबाजीने आसमंत उजळणार

सीमोल्लंघनाच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रावणालाचे दहन करण्यात येणार आहे. यावेळी आतिषबाजीने आसमंत उजळून जाणार आहे. या सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

First published:

Tags: Beed, Beed news, Dasara, बीड