जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परीक्षेत आलेल्या अपयशानं खचली; विद्यार्थीनीनं आयुष्यच संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

परीक्षेत आलेल्या अपयशानं खचली; विद्यार्थीनीनं आयुष्यच संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करूनही परीक्षेत यश न आल्यानं विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 18 जून, सुरेश जाधव : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करूनही नीट परीक्षेत यश न आल्यानं, नैराश्यातून 18 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील  साबळा गावामध्ये घडली आहे.  दिपाली विश्वनाथ नाईकनवरे असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. हळहळ व्यक्त होत आहे. दोन वर्षांपासून तयारी  दिपाली ही एमबीबीएससाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेची गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत होती. तीनं त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. नुकताच 13 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल लगाला. त्यात तिला कमी मार्क मिळाले. मेहनत घेऊनही परीक्षेत अपयश आल्यानं अखेर दिपालीनं आपलं आयुष्य संपवलं आहे.

Mumbai Mira Road Murder : सरस्वतीच्या विवस्त्र मृतदेहासोबत नग्न होऊन काढले फोटो; सेक्स अ‍ॅडिक्ट सानेनं गाठला विकृतीचा कळस

गावावर शोककळा  दिपाली एमबीबीएससाठी नीटची तयारी करत होती. दोन वर्षांपासून तिचा अभ्यास सुरू होता. मात्र एवढी मेहनत घेऊनही परीक्षेत यश मिळालं नाही. त्यामुळे ती नाराज झाली, अखेर तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपालीच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात