बीड, 03 मार्च : ‘परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आम्हाला कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या. बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत म्हणून ते त्यांच्या मित्रांना असा अमृत अमृतमहोत्सव साजरा करण्यास दिला नसता, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिला. (संजय राऊत यांच्यावर शरद पवार नाराज, उद्धव ठाकरेंसमोरच बोलून दाखवलं) स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अमृत महोत्सव घेता आला नाही. ती संधी अन् हे भाग्य आमच्या नशिबी नव्हते. आज सुद्धा माझे बाबा नाहीत हे दुःख पचवण मला खूप कठीण जाते तर त्यांच्या मित्रांनाही पचवणं कठीण होत पण आपल्या सगळ्याच्या सोबतीमुळे आम्ही एकमेकांना सहारा देत आलो. अचानकपणे बाबा आम्हाला सोडून गेले अन् माझ्या खांद्यावर परिवार सांभाळण्याचे खूप मोठं आव्हान होतं. माझे खांदे ओझ्याने झुकले होते पण सर्वांनी वाटून घेतलेल्या जिमेदारीमुळे मी आज मोकळेपणाने काम करत असल्याचे ही बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. (Big Breaking : मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला, मॅार्निंग वॅाकला आले असता स्टम्पने मारहाण) ‘एखाद्या माणसाला चांगलं बोलून झालं नाही तरी चालेल पण एखाद्याचे वाईट बोलेन, असं माझ्याकडून होणं नाही. परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, माझ्या घरात आहे का कोणी मोठा भाऊ, का कोणी आम्हाला सांगणारे नाही, आम्ही तीन मुली आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनातील भावना बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.