बीड, 28 जानेवारी : बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संंबंधातून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या पिंपळनेरमध्ये घडली. महिलेने विहिरीत उडी घेतली, तर पुरुषाने गळफास घेवून जिवन संपवले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मोहन बाबूराव नरवडे अस मयत पुरुषाचे नावं आहे. कौसाबाई जाधव असे महिलेच नाव आहे.
प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील पिंपळनेरमध्ये प्रेमियुगुलाने आत्महत्या केली आहे. अनैतिक संबंधातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दोघांनी एकाचवेळी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पुरूषाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर महिलेने विहीरीत उडी घेत आपले जीवन संपवले.
हे ही वाचा : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह! इच्छेविरुद्ध शरीरसंबंध अन्.. बीड हादरलं
याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मोहन बाबूराव नरवडे अस मयत पुरुषाचे नावं आहे. कौसाबाई जाधव असे महिलेच नाव आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीडमध्ये 24 तासांत दोन मोठ्या घटना
पैशाच्या कारणावरून मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान मारहाण केल्याच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने दिवसभर बंद ठेवून निषेध व्यक्त केला. मारहाण करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. शहरातील किराणा, कापड दुकान, हार्डवेअर, मेडीकल हॉटेल्स, पानटपरी, सलुनची दुकाने, जनरल स्टोअर्स यासह जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आले.
हे ही वाचा : साखर झोपेत काळाचा घाला; चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात, 1 ठार 12 जखमी
दरम्यान ग्रामीण भागातून किराणा व कापड खरेदीसाठी आलेल्या सामान्य लोकांना रिकाम्या हाताने गावाकडे परतावे लागले. आज सकाळपासून वडवणी शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.