मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साखर झोपेत काळाचा घाला; चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात, 1 ठार 12 जखमी

साखर झोपेत काळाचा घाला; चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात, 1 ठार 12 जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मजुरांना घेऊन जाणारी बस वळणावर उलटून हा अपघात झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मजुरांना घेऊन जाणारी बस वळणावर उलटून हा अपघात झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मजुरांना घेऊन जाणारी बस वळणावर उलटून हा अपघात झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

चंद्रपूर, 28  जानेवारी, हैदर शेख : चंद्रपूर जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मजुरांना घेऊन जाणारी बस वळणावर उलटून हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, बारा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ही ट्रॅव्हल बस छत्तीसगडमधून मजुरांना घेऊन हैदराबादला जात होती. याच दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात विरुर -धानोरा मार्गावर ही बस पलटी झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

झोपेत असताना अपघात   

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  छत्तीसगडमधून मजुरांना घेऊन एक ट्रॅव्हल बस हैदराबादला जात होती. याच दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये विरुर-धानोरा मार्गावर एका वळणावर ही बस उलटली. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, बारा मजूर जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण 32 मजूर प्रवास करत होते. प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाल्यानं अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला, चेतन रात्रे  असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे.

बचाव कार्याला सुरुवात  

दरम्यान घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली. या अपघातामधील गंभीर जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.तर इतर किरकोळ जखमींवर विरुर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

First published: