मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह! इच्छेविरुद्ध शरीरसंबंध अन्.. बीड हादरलं

17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह! इच्छेविरुद्ध शरीरसंबंध अन्.. बीड हादरलं

 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह

17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह

बीड मध्ये एका पोलिसाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

सुरेश जाधव, बीड

बीड, 25 जानेवारी : बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिल्यानंतर तिचा खाजगी रुग्णालयात गोळ्या देऊन गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकरणात आरोपीला पोलीस वाचवत असल्याचा आरोप होत आहे. बीड जिल्हा बालविवाह करण्याच्या बाबतीत, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बालविवाह रोखण्यासाठी शासनाकडून एक ना अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशिक्षित समाजासोबत आता सुशिक्षित लोक देखील बालविवाह करत असल्याचे समोर आले आहे.

बालविवाहाचा गुन्हा का दाखल केला नाही?

17 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडितेचा पती हा बीड पोलीस दलात आहे. 18 मे 2022 रोजी तिचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला. त्यानंतर सासरच्या मंडळीने एक महिना चांगले नांदवले. त्यानंतर पती, सासरा, सासू, भाया, जाऊ, दीर, नणंद यांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. 15 लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका, असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला. त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने शिवीगाळ करत मारहाणही केली. विशेष म्हणजे ही फिर्याद देताना पीडितेने आपलं वय 17 असल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील 17 वर्ष नोंदवलं आहे. मग हे सर्व असताना संबंधित पोलिसांनी आणि ठाणे प्रमुखांनी बालविवाहाचा गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय.

वाचा - सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर हादरलं; आरोपींनी मुलीला गाडीत बसवलं अन,..

पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी : जयंत पाटील

यासंदर्भात बालकल्याण समिती पुढे दिलेल्या जवाबातून मुलीवर अल्पवयीन वयातच लग्नाची जबाबदारी आली व इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि गर्भपात झाला, हुंड्याची मागणी झाली, मारहाण देखील केली तरी पोलीस गंभीरपणे हे प्रकरण घेत नसल्याचं बालहक्क समितीचे कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक यांना विचारले असता संबंधित प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चौकशी दरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आल्या असून त्यानुसार दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं. याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केले आहे.

बालकल्याण समिती दिलेली लिखित पत्र मजकूर

17 वर्षीय पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बालकल्याण समितीमध्ये लिखित म्हणणं मांडलंय. यामध्ये तिने म्हटलंय की माझ्या इच्छेविरुद्ध माझा बालविवाह झाला आहे. मी नववीत असताना 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझा साखरपुडा झाला. त्यावेळी मला काही समजत नव्हते. मात्र 18 मे 2022 रोजी माझा विवाह सचिन पवार (रा. काळेगाव हवेली तांडा) याच्याशी लावून दिला. या विवाहाला माझा विरोध होता. त्यानंतर माझ्या पतीने माझ्या सोबत इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले, इच्छा नसतानाही बळजबरी केली. मी त्यातून गर्भवती राहिले, त्यानंतर माझ्या पतीने बीडमधील घोळवे हॉस्पिटलमध्ये नेऊन माझी तपासणी करत सोनोग्राफी केली. मेडीकलमधून गोळ्या आणल्या. त्या गोळ्या घरी आल्यावर स्वतःच्या हाताने खाऊ घातल्या. त्यानंतर 24 जून 2022 रोजी पुन्हा माझ्या पतीने घोळवे हॉस्पिटलमध्ये नेले आणि तेथे तपासणी केली असता, मला पांढरी कावीळ झाल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीने मला माहेरी नेऊन सोडलं. यानंतरही पती सारखे धमक्या देत आहेत, बालविवाह बाबत, गर्भपाताबाबत कुठेही कसल्याही प्रकारची तक्रार केली, तर माझे काही वाकडे होणार नाही. त्यामुळे माझ्या पतीसह ज्यांनी ज्यांनी माझा बालविवाह लावला त्या सर्वांवर कारवाई करावी. अशी आर्त हाक पीडितेने बालकल्याण समितीला केलेल्या लिखित अर्जातून केली आहे.

First published:

Tags: Beed, Crime