रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 7 एप्रिल: भारतात फार प्राचीन काळापासून पाळीव प्राणी म्हणूनच कुत्रा किंवा श्वानाचा सांभाळ केला जातो. शिकार आणि राखणदारी हे दोन प्रमुख उद्देश या श्वान पालनामागे होते. अलिकडे हौस म्हणून अनेक लोक श्वान पालन करू लागले आहेत. त्यासाठी ते मोठी किंमत मोजून श्वान खेरदी करतात. त्यासाठी श्वान पालनाला बीड सारख्या ग्रामीण भागातही व्यावसायिक स्वरुप प्राप्त होत आहे. यामध्ये प्रामुख्याने परदेशी जातीच्या श्वानांचे पालन केले जाते. श्वान पालनातून कोट्यवधींची उलाढाल प्रामुख्याने शहरी भागात श्वान पालनाचे विविध हेतू आहेत. त्यासाठी शहरी लोक मोठी रक्कमही मोजायला तयार असतात. त्यामुळे श्वान पालन व्यवसायात सध्या कोट्यवधींची उलाढाल होत आहे. शहरातील हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले असून ग्रामीण भागातही देशी श्वानांसोबत परदेशी जातींच्या श्वानांचा सांभाळ करण्यात येत आहे. तसेच त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
नोकरी सोडून सुरू केले श्वान पालन बीडमधील एका तरुणाने चक्क श्वान पालनासाठी नोकरीला रामराम ठोकला. एमआयडीसी परिसरात राहणारे अन्वर शेख हे बीड नगरपरिषदेत स्वच्छता विभागात कार्यरत होते. त्यांना श्वान पालनाची आवड होती. त्यातच यातील व्यावसायिक मूल्य त्यांना समजले. सुरुवातीला त्यांनी नोकरी करत श्वान पालन आणि विक्री सुरू केली. पुढे या व्यवसायात जम बसत गेला. तसे त्यांनी नोकरीला सोडचिठ्ठी दिली व पूर्णवेळ श्वान पालनाचा व्यवसाय सुरू केला. Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम! तातडीनं करा ‘हे’ उपाय, Video वर्षाकाठी लाखोंची कमाई अन्वर शेख यांना नोकरीतून वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपये मिळत होते. आता श्वान पालन व त्यांच्या विक्रीतून ते लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांनी परदेशी जातीचे श्वान पाळले आहेत. त्यांना मोठी मागणी असल्याने ते चांगला नफा मिळवत आहेत. ते श्वानांच्या पिल्ल्यांची विक्री पुणे, अंबाजोगाई, माजलगावसह इतर जिल्ह्यातही करतात. त्यांना वर्षाकाठी या व्यवसायातून तीन ते चार लाख रुपयांचा फायदा होत आहे. जिल्ह्यात कोणत्या जातीच्या श्वानांना मागणी बीड जिल्ह्यात विविध जातीच्या श्वानांना मागणी आहे. यामध्ये डॉबरमॅन, पामेरियन, जर्मन शेफर्ड, पिटबुल, अमेरिकन बुली आदी प्रजातींच्या श्वानांना अधिकची मागणी आहे. तसेच काही ठिकाणी कारवानी, पश्मी जातीच्या श्वानांचेही पालन केले जाते. Latur News: लातूर जिल्ह्यात आहे श्वानांचं गाव, परदेशातूनही आहे मागणी पण… पाहा Video काय असतो श्वानांचा दर? जर्मन शेफर्ड 10 ते 15 हजार, डॉबरमॅन 8 ते 10 हजार, अमेरिकन बूली 20 ते 25 हजारापर्यंत श्वानांचा दर असतो.