ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 4 एप्रिल: भारतात फार पूर्वीपासून पाळीव प्राणी म्हणून श्वान पाळले जातात. अलीकडे परदेशी जातींचे श्वानही लोक सांभाळत आहेत. तर काही भारतीय जातीच्या श्वानांनाही परदेशात मोठी मागणी आहे. लातूर जिल्ह्यात असेच एक श्वानांचे गाव असून जानवळ पश्मी म्हणूनच गावाला ओळखले जाते. येथील कारवान व पश्मी जातीचे श्वान प्रसिद्ध असून परदेशातूनही मोठी मागणी आहे. परंतु, कोरोना काळापासून श्वानांच्या विक्रीवर बंदी आल्याने श्वान पालक संकटात आहेत. जानवळ पश्मी नावानेच गावाची ओळख चाकूर तालुक्यातील जानवळ हे गाव कुत्र्यांमुळे सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. येथील पश्मी आणि कारवान ही श्वानांची जात प्रसिद्ध आहे. शिकारीसाठी म्हणून ओळखली जाणारी कारवान जात आणि राखणदारीसाठी म्हणून प्रसिद्ध असणारी पश्मी ही जात येथील नागरिकांनी काही शतकांपासून सांभाळली आहे. स्थानिक पातळीवर काहीजण येथील कारवान या कुत्र्यास बांगडी कारवान असेही म्हणतात. जानवळ गावालाही जानवळ पश्मी या नावानेच ओळखळे जाते.
शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून उत्तम पर्याय जानवळ येथे शेतीसोबत जोदधंदा म्हणून श्वान पालन केले जाते. जानवळ या गावातील सुमारे 300 ते 400 लोक पश्मी व कारवान या दोन्ही जातींच्या श्वानांची विक्री करून लाखो रुपयांची कमाई करतात. सध्या येथील युवा पिढी श्वानांची देखभाल विक्री याकडे व्यवसायिक दृष्टीने पाहत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात 10 ते 15 हजार रुपये किमान दरापासून कारवान आणि पश्मी जातीच्या श्वानांची विक्री केली जाते. तर जिल्ह्याच्या बाहेर याची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे. परदेशातही आहे मागणी या श्वानांची मागणी दुबई या देशातही जास्त असून तेथे शिकारीसाठी याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील सीमावरती भागात तसेच कोल्हापूर, सांगली, पंढरपूर येथेही कारवान कुत्र्याची जात आढळते. परंतु, लातूर जिल्ह्यातील जानवळ येथील कारवान जातीच्या कुत्र्याचे तोंड अधिक लांब आकाराचे असल्याने शिकारीसाठी याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. यामुळे जगातील अनेक देशांमध्ये या श्वानाची मागणी वाढताना दिसून येत आहे. Latur News: लातूरच्या गाईची शिर्डीत बाजी; पशुप्रदर्शनात देवणी वळू अव्वल, Video कारवान जातीचे श्वान अधिक चपळ कारवान जातीच्या श्वानांचे धावण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे मुधोळ जातीच्या श्वानांपेक्षा ते जास्त चपळ समजले जातात. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक येथील मुधोळ जातीच्या श्वानांना सैन्यात दाखल करून घेतले असून त्याच्या विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. अशीच मागणी कारवान व पश्मी या जातींच्या श्वानांच्या सांभाळ करणाऱ्या वर्गाकडून केली जात आहे. राखणदारीसाठी प्रसिद्ध पश्मी श्वान कारवान ही जात जशी शिकारीसाठी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे पश्मी जात राखणदारीसाठी म्हणून ओळखली जाते. पश्मी हा एकाच रंगात आढळतो. याचे आयुष्य 15 ते 16 वर्षांचे आहे. पश्मी ही जात मूळ कजाकिस्तानची असल्याचे सांगितले जाते. तायघन ब्रीड या नावाने तिची ओळख आहे. जानवळकरांनी मात्र हे ब्रीड सांभाळलेच नाही तर जतनही केले आहे. माकडाच्या मृत्यूनंतर विधीपूर्वक अंत्यसंस्कार, 13व्या दिवशी सुंदरकांड पठण, अन्नदानाचेही आयोजन कोरोना कालखंडानंतर परदेशात श्वानांच्या विक्रीवर बंदी कारवान व पश्मी या दोन्ही जातींच्या श्वानांची परदेशात मागणी आहे. मात्र, कोरोना कालखंडानंतर अनेक देशांनी भारतीय श्वानांवर बंदी घातली आहे. यामुळे परदेशातील मागणी असतानाही ते पाठवणे शक्य होत नसल्याचे श्वान पालक शाम बरुरे यांनी सांगितले.