‘पप्पा तुम्ही परत या...’, बाप गेल्याचं दु:ख मांडणाऱ्या चिमुरड्याचा निबंध वाचून पाणीच येईल डोळ्यात!

‘पप्पा तुम्ही परत या...’, बाप गेल्याचं दु:ख मांडणाऱ्या चिमुरड्याचा निबंध वाचून पाणीच येईल डोळ्यात!

मंगेश वाळके या 10 वर्षाच्या मुलाने शाळेत लिहिलेला वडिलांवरचा निबंध सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

बीड 19 जानेवारी : वय वर्ष 10-11, इयत्ता चौथीत शिकणारा मंगशे वाळके हा मुलगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीत राहणाऱ्या मंगेशच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. एकीकडे वडिल नाही दुसरीकडे आई अपंग अशा मंगेशने बाळहट्ट पुरवायलाही कोणी नाही. अशा या चिमुरड्यावर आपल्या वडिलांवर पत्र लिहिण्याची वेळ आली अन् त्यानं सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या आहेत. सध्या मंगेशचा निबंध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाळेत मंगेशला माझे बाबा या विषयावर निबंध लिहावा लागला आणि त्यानं आपल्या मनातील सर्व दु:ख बाहेर काढले. या निबंधाची दखल सामाजित न्याय विकास मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घ्यावी लागली.

वाचा-48 वर्षांनंतर अखेर कुटुंबीयांशी भेट, फेसबुक व्हिडीओमुळं चमत्कार

मंगेशनं लिहिलेला निबंध –

“माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या, आई अपंग आहे त्यामुळं मला आईला मदत करावी लागते”

वाचा-डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यास टेन्शन नका घेऊ, करा 'हे' काम

वाचा-रावसाहेब दानवेंनी दिलं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले...

धनंजय मुंडे यांनी जाहीर केली मदत

सामाजिक न्याय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मंगेशला मदत जाहीर केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5% बसचा पास आणि दिव्यांग महामंडळामार्फत आणखी काही योजना लागू करून भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beedViral
First Published: Jan 19, 2020 07:24 PM IST

ताज्या बातम्या