मुंबई, 19 जानेवारी: डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कस्टमर केअरला फोन करण्याचं सुचत नाही. अथवा त्यांचा नंबर लागत नाही. अशा वेळी गांगरून न जाता ब्लॉक कसं करता येईल याचा विचार करायला हवा. वेळीत ते कार्ड ब्लॉक केलं नाही तर त्यातून पैसे जाण्याची भीती अधिक असते. कार्ड खराब झाल्यावरही ते तात्काळ ब्लॉक केलं जातं. कस्टमर केअरला फोन न लावता हे कार्ड तुम्ही कुठूनही ब्लॉक करू शकता. यासाठी काय करायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. क्रेडिट कार्ड हरवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण जर क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर भरपाईचीही व्यवस्था आहे. तुम्ही बँकेकडे भरपाईची मागणी करू शकता. काही अडचणींमुळे जर कस्टमर केअरला फोन करणं शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या पर्याय वापरू शकता. सर्वात आधी तुम्हाला नेटबँकिंगनं लॉगइन करावं लागेल. लॉगइन केल्यावर तुमच्यासमोर तुमच्या अकाऊंटची सर्व माहिती येईल. यात तुम्हाला ई- सर्विसेस या सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला एटीएम कार्ड सर्विसचा पर्याय निवडावा लागले. यानंतर ब्लॉक एटीएम कार्ड हा पर्याय निवडावा. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो सुरू होईल. यावर तुम्हाला कार्ड ब्लॉक का करायचे आहे यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एकाची निवड करायची आहे. ते झाल्यावर तुम्हाला बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल किंवा मेलवर OTP येतील. या दोन्हीपैकी जिथे नंबर येतील तो पिन नंबर कुणालाही न सांगता तिथे अपलोड करा. त्यानंतर तुमचं कार्ड ब्लॉक होईल. सर्वसामान्यपणे सर्व नेटबँकिंगमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही या पद्धतीने ब्लॉक करु शकता. हेही वाचा- 59 मिनिटांत कसं मिळवायचं 1 कोटींपर्यंत कर्ज, ही आहे संपूर्ण प्रोसेस हेही वाचा- ट्रेनचं कोणतंही तिकीट काढणं आता होणार सोपं हेही वाचा- स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याआधी 05 गोष्टी नक्की वाचा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.