रावसाहेब दानवेंनी दिलं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले...

रावसाहेब दानवेंनी दिलं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे त्यांची बडबड सुरूच आहे. त्यांना माझे चॅलेंज आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 19 जानेवारी : राजूर संस्थानची जमीन बळकावण्याच्या आरोपावरून भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. चंद्रकांत खैरे यांनी कागदपत्रासह आरोप सिद्ध करावे असं ओपन चॅलेंजच दानवेंनी दिलं आहे.

नाशिकमध्ये रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या राजूर संस्थानच्या आरोपांना उत्तरं दिली. 'खैरे यांनी माझं नाव घेऊन आरोप करावे. मी राजूर संस्थानचा सचिव आहे. राजूर संस्थानची जमीन कुणीही बळकावली नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे त्यांची बडबड सुरूच आहे.  त्यांना माझे चॅलेंज आहे. संस्थानची जागा कुणी बळकावली हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. तसंच मी जर बळकावली असेल तर ते कागदानिशी दाखवावे', असं आव्हानच दानवे यांनी खैरेंना दिलं.

'अमर अकबर अॅन्थोनी सरकार'

हे सरकार ब्रेक सरकार आहे. अमर अकबर अॅन्थोनी हे तिघांचं मिळून आलेलं सरकार आहे. त्यामुळे हे अमर अकबर अॅन्थोनी सरकार फार कार काळ चालणार नाही. तहसीलदाराला खुर्चीत बसवून काम होत नाही. त्यांच्याकडून काम करून घेता आली पाहिजे, असा टोलाही दानवेंनी सेनेला लगावला.

'नाईट लाइफला आम्ही नकार दिला'

शिवसेना ही आमच्यासोबत सत्तेत होती. तेव्हा नाईट लाइफबद्दल सेनेनं मागणी केली होती. पण त्यावेळी नाईट लाईफच्या निर्णयाला आम्ही मान्यता दिली नव्हती.  आता महाविकासआघाडीची सत्ता आहे. याबद्दल काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे, असंही दानवे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांची पाठराखण

रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण करत मीडियावर खापर फोडलं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचं मोडतोड करून दाखवण्यात आलं. सर्वानुमते निर्णय घेणारा आमचा पक्ष आहे, असं म्हणत दानवेंनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली.  चंद्रकांत पाटली यांनी, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे, असं वक्तव्य केलं होतं.

 CAA बद्दल विरोधकांनी गैरसमज पसरवला

CAA हा नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा नाही.  फाळणी झाली तेव्हा  पाकिस्तानमध्ये २४ टक्के हिंदूंची संख्या होती. मात्र, आता ३ टक्के आहे.  बांग्लादेशमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र, विरोधकांनी सुरुवातीपासून गैरसमज पसरवला आहे भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांना सर्व परिस्थिती समजली आहे, ते ही जनजागृती करत आहे', अशी माहिती दानवेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 04:57 PM IST

ताज्या बातम्या