बीड, 21 ऑगस्ट : पोटच्या मुलानं (son) दारूच्या नशेत (drunk) जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याने, वृद्ध आईचा (mother) जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक अन् संतापजनक घटना बीड (beed) जिल्ह्यातील चौसाळा गावामध्ये उघडकीस आली आहे. तर आईचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतात, नराधम आरोपी मुलाने घटनास्थळावरून पलायन केलं होतं. मात्र दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे (वय 70) असं मयत वृद्ध आईचं नाव आहे तर मदन पांडुरंग मानगिरे (वय 28) असं नराधम आरोपी मुलाचे नाव आहे. चुकून भारतीय सीमेत आली पाकिस्तानी मुलं, भारतीय जवानांनी दिलेली वागणूक पाहून… दारुच्या नशेत असणाऱ्या आरोपी मदन मानगिरे याने मयत आई प्रयागबाई यांना, रात्री 11 ते 12 च्या दरम्यान लाकडी मुसळाने जबर मारहाण केली. यामध्ये प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे. ही बाब आज सकाळी आरोपी मदनच्या लक्षात येताच, त्याने घरातून पळ काढला. बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता. मात्र, याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच त्यांनी शहागड येथून आरोपी पांडूरंग यास ताब्यात घेतले. त्याचबरोबर एक दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे.
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने NCA मध्ये पूर्ण केला कोचिंग कोर्स
दरम्यान मयत वृद्धेचे शवविच्छेदन झाले असून आरोपी नराधम मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेकनूर पोलीस ठाण्यात सुरू आहे. आरोपी मुलाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहे.