मराठी बातम्या /बातम्या /देश /

चुकून भारतीय सीमेत पोहोचली पाकिस्तानी मुलं; जवानांनी दिलेली वागणूक आणि शाळा पाहून झाली भावूक

चुकून भारतीय सीमेत पोहोचली पाकिस्तानी मुलं; जवानांनी दिलेली वागणूक आणि शाळा पाहून झाली भावूक

Photo Courtesy: Twitter_rabyanoor1

Photo Courtesy: Twitter_rabyanoor1

पूंछमधील सीमेवर तैनात जवानांनी या मुलांना पकडले (Pakistan Kids captured on border) होते. जवानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर समजलं, की मुलं चुकून आपल्या हद्दीत आली आहेत.

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आपण पाहिला असेलच. यामध्ये पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या एका चिमुरडीची कथा सांगितली आहे. पाकिस्तानातील ही चिमुरडी भारतात येऊन इथल्या लोकांमध्ये रमते, असा काही भाग या चित्रपटात आहे. असाच अनुभव जम्मूमधील पूंछ जिल्ह्यामध्ये सीमेवर असणाऱ्या गावातील लोकांना आला. पाकिस्तानातील तीन लहान मुलं (Pakistan kids crossed border) चुकून सीमा ओलांडून या गावात पोहोचली होती. मात्र, येथील लोकांनी आणि भारतीय जवानांनी दिलेल्या गोड वागणुकीमुळे (Pakistan kids got emotional in India) या मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.

पूंछमधील सीमेवर तैनात जवानांनी या मुलांना पकडले (Pakistan Kids captured on border) होते. जवानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर समजलं, की मुलं चुकून आपल्या हद्दीत आली आहेत. यानंतर सेनेचे जवान या मुलांना घेऊन जवळच्या मशिदीत गेले. या ठिकाणी या मुलांनी नमाज अदा केली. यानंतर जवान या मुलांना शाळेतही घेऊन गेले. या शाळेतील वातावरण, तिथं शिक्षण घेत असलेली आपल्याच वयाची मुलं पाहून या तिघांच्याही भावना (Pakistani Kids in India) उचंबळून आल्या होत्या. अमर उजालाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या मुलांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. धनयाल मलिक (17), अरबाज रहीम (13) आणि उमर रहीम (9) अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघेही पाकव्याप्त काश्मिरचे रहिवासी असल्याचं चौकशीत समोर आलं. हे तिघेही मासे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. फिरत फिरत चुकून ते भारताच्या हद्दीत पोहोचले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

बस जात असताना कोसळली दरड; जीव मुठीत धरुन पळाले प्रवासी, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

शुक्रवारी दुपारी केजी बिग्रेडचे कमांडर राकेश नायर यांनी या तिन्ही मुलांना चक्का दां बाग येथील राह-ए-मिलन वर पोहोचवले. या ठिकाणी मेजर अमित आणि नायब तहसीलदार मोहम्मद रशीद यांनी पाकिस्तानच्या मेजर वाहिद आणि मेजर सज्जाद यांच्याकडे या मुलांना सोपवले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यापूर्वी (Pakistani kids returned home) या मुलांना भारतीय जवानांनी भेटवस्तूही दिल्या होत्या.

या मुलांसोबत आणखी एक व्यक्तीही सीमा ओलांडून आली होती, जी नंतर परतही गेली होती. तसेच, देशाच्या पूर्व भागातही सना आणि लाईबा या दोन मुली सीमा ओलांडून देशात आल्या होत्या. त्यांनाही मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. या पूर्वी गेल्या वर्षी 6 डिसेंबर आणि 31 डिसेंबरलाही पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेमध्ये आल्याच्या घटना घडल्या होत्या. या लोकांनाही जवानांनी त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले होते.

First published:

Tags: Indian army, Pakistan