मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धनंजय मुंडे Vs पंकजा मुंडे, राजकारण तापलं; बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून तुफान राडा

धनंजय मुंडे Vs पंकजा मुंडे, राजकारण तापलं; बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून तुफान राडा

Beed Politics : भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

Beed Politics : भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

Beed Politics : भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

बीड, 20 मार्च : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून मुंडे बहिण-भावात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. अशा स्थितीतच परळीमध्ये मतदानाची वेळ संपल्यावर आलेल्या मतदारांवरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी खुर्च्यांची फेकाफेकी करत कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी आज मतदान सुरू होते. दुपारी चार वाजता मतदान संपले. मात्र तरीही परळीच्या औद्योगिक वसाहत केंद्रावर काही मतदार आले होते. त्यावर आक्षेप घेण्याच्या मुद्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करत मोठा गोंधळ घातला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडे आरोपांच्या चौकशीची मागणी करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे विरुद्ध भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

पंकजा मुंडेंची खरमरीत टीका

'बीड जिल्ह्याचं भवितव्य धोक्यात आहे. पालकमंत्री बालिश निर्णय घेत आहेत,' अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्या आरोप केला आहे.

दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील भाजपचे आणखी एक नेते सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान दिलं आहे. 'धनंजय मुंडे यांनी माजी पालकमंत्र्यांवर बोलण्याऐवजी अगोदर मतदानाची टक्केवारी तपासावी. भाजपवर टीका करण्याऐवजी पुढच्या सहा महिन्यात हिंमत असेल तर याच बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक लावावी. आम्ही ती संपूर्ण निवडणूक लढवू,' असं सुरेश यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Dhananjay munde, Pankaja munde