कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय़, पंढरपुरातील चैत्र वारी सोहळा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय़, पंढरपुरातील चैत्र वारी सोहळा रद्द

वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी चैत्र वारी अखेर रद्द करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला पंढरपुरातील (Pandharpur) चैत्र वारी सोहळात कोरोनाचे (Coronavirus) विघ्न आल्याने यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackaray) यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या (covid - 19) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकऱ्याच्या आणि भक्त भागवताच्या अंत:करणात विठ्ठलभक्तीचे हे सूक्ष्म बीज वारीच्यानिमित्ताने रुजते आणि विठ्ठलाच्या दर्शनाने त्याला बहर येतो. परिणामी आज चैत्र वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी चैत्र वारी अखेर रद्द करण्यात आली आहे. दि.4 एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे.

संबंधित - नोटांवर थुंकण्याऱ्या विकृतांवर उद्धव ठाकरे संतापले, कडक शब्दांत दिला इशारा

मात्र यंदा देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. अशावेळी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी एका ठिकाणी जमा न होणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन सांगितले आहे. अशावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस या नियमांचे पालन करणे गरजेचे असून सर्व सण-उत्सव घरच्या घरी साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा गुढीपाडवाही नागरिकांनी घरच्या घरीच साजरा केला. त्यानुसार राज्यातील सर्व सोहळे घरात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या अराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या चैत्र वारी रद्द केल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंदिर समितीने दि.17 मार्च ते 31 मार्च अखेर श्री विठ्ठल -रुक्‍मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता 14 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित - दिवे लावण्यापेक्षा..,आव्हाडांनी केलं राज्यासाठी जनतेला 'हे' आवाहन

First published: April 4, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading