दिवे लावण्यापेक्षा..,आव्हाडांनी केलं राज्यासाठी जनतेला 'हे' आवाहन

दिवे लावण्यापेक्षा..,आव्हाडांनी केलं राज्यासाठी जनतेला 'हे' आवाहन

लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका.

  • Share this:

 

मुंबई, 04 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशपातळीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या खबरदारी घेतल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली होती.

'येत्या पाच तारखेला रात्री 9 वाजता घरातील लाईट घालवा आणि दिवे लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं वेगळं आहे. लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा', असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.

हेही वाचा - शिवाजी पार्कात कोरोनाचा शिरकाव, पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

तसंच,' जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त 101 रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा', अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे.

हेही वाचा -'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे? पाहा VIDEO

'लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा', असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली.

'प्रत्येक गोष्टीत इव्हेंट का करावा वाटतो'

कालही आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर सडकून टीका केली होती. 'देशाला आशा होती की मोदी हे जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारतातील कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटलं होतं. पण प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायला यांना का वाटता?' असा सवाल करत त्यांनी टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2020 02:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading