ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा धोका वाढवणारी घटना, दुकानाबाहेर तब्बल 1 KM पर्यंत रांग

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा धोका वाढवणारी घटना, दुकानाबाहेर तब्बल 1 KM पर्यंत रांग

  • Share this:

ठाणे, 15 एप्रिल : अनेक देशांना अक्षरश: उद्धवस्त करणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतालाही धडक दिली आहे. देशात हा व्हायरस आणखी पसरू नये यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर आधी सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा आणि आता त्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र काही भागात हा निर्णय धाब्यावर बसवला जात आहे. ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील रेशन दुकानात प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. साबे रोड येथील दुकानाबाहेर तब्बल 1 किलोमीटरपर्यंत लोकांची रांग लागली आहे. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत असल्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याचीच शक्यता आहे.

काल नेमकं काय झालं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या निर्णयानंतर आपल्या घरी जाण्यासाठी आसुसलेल्या परराज्यातील मजुरांनी एकच टाहो फोडला आहे. आम्हाला आमच्या गावी परत पाठवा, अशी मागणी करत हजारो मजूर ठाण्यातील मुंब्रा भागात रस्त्यावर उतरले होते.

मुंब्रा नाका येथे कामगार आणि परराज्यातील मजुरांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. त्यांना इथे रहायचे नसून आपल्या गावी परत पाठवा असा आरडा ओरडा हे कामगार करु लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आणि त्यामुळे लॉकडाऊन वाढवला गेला. मात्र त्यामुळे एकतर कोरोना होण्याची भीती आणि दुसरे म्हणजे काम काम मिळत नसल्याने उपासमारीचे सकंट अशा दुहेरी अडचणीत मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात असलेले उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील नागरिक अडकून पडले आहेत.

First published: April 15, 2020, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या