मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नोकरी सोडून उद्योजक व्हायचंय? मग 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

नोकरी सोडून उद्योजक व्हायचंय? मग 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

उद्योजक व्हायचं स्वप्न बघणं चांगलंच. पण हातातली नोकरी सोडण्यापूर्वी काही गोष्टींचा पूर्ण विचार करणंही आवश्यक आहे.

उद्योजक व्हायचं स्वप्न बघणं चांगलंच. पण हातातली नोकरी सोडण्यापूर्वी काही गोष्टींचा पूर्ण विचार करणंही आवश्यक आहे.

उद्योजक व्हायचं स्वप्न बघणं चांगलंच. पण हातातली नोकरी सोडण्यापूर्वी काही गोष्टींचा पूर्ण विचार करणंही आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर: उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या कंपनीत काम करायचं अनेकांचं स्वप्न असते. अनेक तरुण-तरुणी गल्लेगठ्ठ पगार देणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरी करतात. मात्र, कंपनीत टार्गेटचे प्रेशर, गुणवत्तेला योग्य वाव नाही, पगार चांगला असूनही समाधान नसल्याने त्यांना ताण जाणवतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ताळमेळ ठेवण्यात अडचण येते. त्यांचे मन तिथे रमत नाही. कष्टाचे सार्थक होत नसल्याची भावना त्यांच्या मनामध्ये घर करते. अशा वेळी नोकरी सोडून आपला नवा व्यवसाय सुरू करावा, असं अनेकांना वाटतं. जर तुम्हीचीही सध्या स्टार्ट अप आयडियावर (Start Up Idea) काम करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे.

    आपल्या सर्वांना उद्योजकांचे चकमकणारे जग दिसते. मात्र, त्यांनी सहन केलेल्या त्रासांची आणि प्रयत्नांची आपल्या कल्पनादेखील नसते. समोरच्याचं आयुष्य जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्षात ते तितकं नसतं, हे लक्षात ठेवा.

    Career Tips: 'या' तीन क्षेत्रांमध्ये आहेत करिअर करण्याची सर्वात मोठी संधी

    त्यामुळे स्टार्ट अप सुरू करण्यापूर्वी नोकरी आणि व्यवसायातील फरक जाणून घ्यायला हवा.

    वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाचा समतोल ढासाळतो

    व्यवसायिक जगात पाऊल ठेवताच काम आणि वैयक्तिक आयुष्यातील फरक संपुष्टात येऊ लागतो. आराम विसरून कष्टाने काम करावं लागतं. उठता-बसता- झोपताना डोक्यात सतत कामाच्या गोष्टींचा विचार असतो.

    कार्यालयीन सुविधा मिळत नाहीत

    स्टार्ट अप केल्यावर कदाचित तुम्हाला एखाद्या छोट्या जागेतून काम सुरू करावे लागू शकते. आशावेळी नोकरी करताना कंपनीत तुम्हाला मिळत असलेल्या सुविधा येथे उपलब्ध नसतात. व्यवसायात कॉफी मशिन, हेल्पर, प्रिंटिंग मशिन इत्यादींची व्यवस्था करायला बराच वेळ लागतो. महिन्याला पगाराची हमी नसते.

    निश्चित कमाई नाही

    जेव्हा तुम्ही नोकरी करता, तेव्हा प्रत्येक महिन्याला पगार तुमच्या खात्यात जमा होते. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला ठराविक पगाराची सवय लागलेली असते.

    TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे तब्बल 166 जागांसाठी भरती

    मात्र, व्यवसायात (Business Or Job Difference) तसे नसते. व्यवसाय रुळावर येण्यासाठी काही महिने ते वर्षे लागू शकतात. आशावेळी नफ्याची हमी नसते. स्टार्टअपमध्ये निश्चित कमाई किंवा नफा मिळविण्यासाठी (How To Earn Money) वेळ लागू शकतो.

    यश मिळणं कठीण

    व्यवसाय सुरू केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला लवकर यश मिळते. मात्र, काहींना सुरवातीला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला यशच मिळेल हे सांगता येणं कठीण आहे. कारण, प्रत्येक व्यवसायाच्या योजना आणि त्यातील गुंतवणुकीचे पर्याय हे वेगळे असतात. म्हणून, व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर स्वतःची तुलना कोणाशीही करू नका.

    या गोष्टी लक्षात घेऊनच व्यवसाय करण्याचा निर्णय घ्या.

    First published:
    top videos

      Tags: Career, जॉब