मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'25 दिन में डब्बल' च्या नादात बार्शीकरांना तब्बल 5 कोटी 63 लाखांना गंडवलं, सोलापुरात खळबळ

'25 दिन में डब्बल' च्या नादात बार्शीकरांना तब्बल 5 कोटी 63 लाखांना गंडवलं, सोलापुरात खळबळ

पाचही आरोपी फरार झाल्यामुळे गुंतवणुकदारांच्या पायाखालीच वाळू सरकली. त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.

पाचही आरोपी फरार झाल्यामुळे गुंतवणुकदारांच्या पायाखालीच वाळू सरकली. त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.

पाचही आरोपी फरार झाल्यामुळे गुंतवणुकदारांच्या पायाखालीच वाळू सरकली. त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.

सोलापूर, 14 जानेवारी : पैसे दुप्पट करून मिळतील या आमिषाला बळी पडून अनेक जणांची फसवणूक झाल्याची प्रकरण समोर आली आहे. आज पुन्हा एकदा सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शीमध्ये (barshi) असाच प्रकार घडला आहे.  बार्शी येथे 28 टक्के परताव्याच्या आशेने सहा बार्शीकरांची तब्बल 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून बार्शी शहरातील लोकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एका झटक्यात 28 टक्के परतावा मिळणार असल्यामुळे लोक आमिषाला बळी पडले. त्यामुळे लोकांनी यात गुंतवणूक केली. पण पैसे घेऊन आरोपी फरार झाले आहे.

(सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी! बॉम्बे इंजिनीअर ग्रुपतर्फे विविध पदांसाठी भरती)

पाचही आरोपी फरार झाल्यामुळे गुंतवणुकदारांच्या पायाखालीच वाळू सरकली. त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. आतापर्यंत 6 लोकांनी जवळपास 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण रा. उपळाई रोड बार्शी यांच्या विरोधात भा.द. वि.कलम 420, 409, 417, 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(शेतीवर झाले 90 लाखांचे कर्ज, फेडण्यासाठी टाकला फिल्मी दरोडा, पण...)

या प्रकरणी आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधित कंपनी सील करण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Solapur