मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनीअर ग्रुपतर्फे विविध पदांसाठी भरती

10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनीअर ग्रुपतर्फे विविध पदांसाठी भरती

या वेबसाईट्सवर तुम्हाला जॉब मिळू शकतो

या वेबसाईट्सवर तुम्हाला जॉब मिळू शकतो

बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर (Bombay Engineering Group and Center) आणि संरक्षण मंत्रालयाच्या (MOD-Ministry of Defence) वतीनं विविध पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे.

मुंबई, 14 जानेवारी : बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर (Bombay Engineering Group and Center) आणि संरक्षण मंत्रालयाच्या (MOD-Ministry of Defense) वतीनं एमटीएस (MTS), स्टोअरकीपर, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक, लस्कर आणि बार्बर/न्हावी आदी पदांसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. या संदर्भात 8 जानेवारी 2022 रोजी रोजगार समाचारमध्ये अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची संधी असून, एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत म्हणजेच 28 जानेवारीपर्यंत ते अर्ज करू शकतात.

बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटरमधल्या जागा :

स्टोअरकीपर ग्रेड 3 - 3

सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर : ट्रेड्स : (रेजिमेंटल सर्व्हेयर टेक्निकल, इलेक्ट्रीशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, कारागीर (बांधकाम), कारागीर (धातुशास्त्र), कारागीर (लाकूडकाम), पेंटर आणि डेकोरेटर, पीसीआर आणि डीएसव्ही) - 22

कुक (Cook) - 9

लस्कर (Lascar) -6

एमटीएस (MTS) - 24

बार्बर/ न्हावी (Barber) - 1

(सहा जागा, 700 विद्यार्थी परीक्षेला, महाराष्ट्राचे 60 ते 70 मुलं आसाममध्ये अडकले)

पगार (Salary):

स्टोअरकीपर, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक - 19900/- + भत्ते

लस्कर, एमटीएस, बार्बर - रु. 18000/- + भत्ते

एमटीएस आणि इतर पदांसाठी पात्रता निकष :

शैक्षणिक पात्रता :

स्टोअरकीपर ग्रेड 3 (Storekeeper Grade III) - उच्च माध्यमिक अर्थात 12 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून त्याच्या समकक्ष.

सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर (Civilian Trade Instructor) - दहावी उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष प्रमाणपत्र, संबंधित ट्रेड आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे राष्ट्रीय प्रमाणपत्र. भरती होणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं पुरेसं कौशल्य आणि ज्ञान आवश्यक

(केंद्र सरकारचं 14 महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या दिवशी गिफ्ट)

कुक (Cook) - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष. भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान आणि प्रावीण्य आवश्यक.

लस्कर (Lascar) - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

एमटीएस (MTS)- 10वी उत्तीर्ण

बार्बर/ न्हावी (Barber) - 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : (Age Limit) 18 ते 25 वर्षं

यासाठी लेखी परीक्षा (Written Test) घेतली जाईल, ज्यामध्ये संबंधित पदाच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजे इयत्ता 10वी/12वी/ITI स्तरावरचे प्रश्न असतील. लेखी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आवश्यक असेल तिथे कौशल्य किंवा प्रात्यक्षिक चाचण्या घेतल्या जातील. लेखी परीक्षेचं माध्यम फक्त हिंदी किंवा इंग्रजी असेल.

अर्ज कसा करावा?

दिलेल्या अर्जाच्या (Application) नमुन्यानुसार पूर्ण भरलेला अर्ज आणि त्यासोबत आवश्यक स्वयं-साक्षांकित कागदपत्रं सीलबंद लिफाफ्यातून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावीत. लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज आहे, (UR/OBC/SC/ST/EWS) (ESM/PWD) यापैकी कोणत्या गटात तुमचा समावेश होतो, याचा उल्लेख असावा. कमांडंट, बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे – 411003 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब