ठाणे, 10 जानेवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवााळी अधिवेशनामध्ये नागपूरमधील भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या मुद्दाचे पडसाद ठाण्यात पाहण्यास मिळाले आहे. ठाणे पालिकेसमोरच भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आज सकाळी ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगर पालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असा बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे, या बॅनरवर कोणत्याही पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव नव्हते. (‘शरद पवार नाहीतर भाजपचं हे स्वप्न होतं’, संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन) त्यामुळे हे बॅनर कुणी आणि का लावले याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. या बॅनरबाजीतून एका प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. हे बॅनर लक्षात आल्यानंतर ठाणे पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकले आहे. दरम्यान, हे डरपोक आणि हिंमत नसलेल्या लोकांची काम आहे. रात्रीच्या अंधारामध्ये बॅनर लावायचे. बॅनर कुणी लावले हे कळलं आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला. एकनाथ शिंदेंवर काय आहे आरोप? (Shivsena Vs Shinde : शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी) एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना NIT चा 86 कोटींचा भुखंड अवघ्या 2 कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. मुख्यमंत्री असताना या निर्णयाची ऑर्डर काढली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. शिंदेंच्या निर्णयानंतर कोर्टाने यावर ताशेरे ओढले. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







