जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'शरद पवार नाहीतर भाजपचं हे स्वप्न होतं', संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन

'शरद पवार नाहीतर भाजपचं हे स्वप्न होतं', संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन

 हे सरकार फेब्रुवारीमध्येच पडणार आहे. या प्रकरणाचा निकाल आधीच लागला असता तर सरकार पडले असते.

हे सरकार फेब्रुवारीमध्येच पडणार आहे. या प्रकरणाचा निकाल आधीच लागला असता तर सरकार पडले असते.

हे सरकार फेब्रुवारीमध्येच पडणार आहे. या प्रकरणाचा निकाल आधीच लागला असता तर सरकार पडले असते.

  • -MIN READ Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जानेवारी : ‘सरकार पाडण्याचे स्वप्न हे भाजपचं होतं. शरद पवार यांच्यामुळे असं काही झालं नाही, ते जसे आरोप करत आहे. कारण, गिरीश महाजन हे आज स्पष्टपणे बोलले आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. जे पोटामध्ये होतं ते ओठांवर आलं आहे’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. तसंच, शिंदे सरकारचा मृत्यू ठरला आहे, मृतदेहामध्ये फुंकलेले प्राण असलेलं हे सरकार आहे, अशी टीकाही राऊतांनी केली. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या निमित्ताने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. ‘राज्यातील घटना बाह्य सरकार आहे. हे राज्याच्या हिताचे नाही आणि सोबत देशाच्या हिताचा देखील नाही. देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे की नाही या खटल्या या खटल्यावर सिद्ध होणार आहे. पैशाचा वारे माप पद्धतीने वापर आमदारांना पळून घेऊन जाणे या आमदाराला त्याची कारवाई करण्याकरता या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत आहे. गेल्या चार महिन्यापासून सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनावणी होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणात फक्त तारखावर तारखा पडत आहे आणि घटनाबाह्य सरकार हे निश्चितपणे हसत आहे. आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही त्यांना वाटत आहे. एक महाशक्ती आमच्या पाठीशी आहे त्यामुळे घटनाबाह्य सरकार चालत राहील महाशक्ती असो की कोणी असो आमचा या देशातील न्याय शक्तीवर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले. (Shivsena Vs Shinde : शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी) सरकार पाडण्याचे स्वप्न हे भाजपचं होतं. शरद पवार यांच्यामुळे असं काही झालं नाही. गिरीश महाजन हे आज स्पष्टपणे बोलले आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. जे पोटामध्ये होतं ते ओठांवर आलं आहे. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे आधी शिवसेनेचे तुकडे करायचे. कारण शिवसेना ही आडवी येऊ शकत होती. देशाचे तुकडे करायचे हे भाजपचे धोरण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. (shivsena symbol : धनुष्यबाण कुणाचे? निवडणूक आयोगात आज सुनावणी, कुणी किती कागदपत्र केली सादर?) हे सरकार फेब्रुवारीमध्येच पडणार आहे. या प्रकरणाचा निकाल आधीच लागला असता तर सरकार पडले असते. कारण, घटनाबाह्य सरकार चालू न देणे हे कोर्टाच्या हातात आहे. काय एका शहाण्या मंत्र्याने मला आव्हान दिलं की, मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. अहो, जरा कानातले बोळे काढून टाका, नायतर मी पाठवतो. जर कोर्टाचा निकाल लागला तर सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा मी म्हणालो आहे. या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. मृतदेहामध्ये फुंकलेले प्राण आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात