खेड, 05 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा होत आहे. पण, त्याआधीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणचा भाग्यविधाता देव माणूस रामदास कदम असा बॅनर वरती उल्लेख केला आहे. तर माजी आमदार संजय कदम यांची राक्षसाचा बॅनर म्हणून खिल्ली उडवली. खेड येथे आज उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या आधी आता राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उद्धव ठाकरे गटाला डिवचण्यासाठी रामदास कदम समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गवर भरणे नाका येथे कोकणचा भाग्यविधाता देव माणूस रामदास कदम असा बॅनर झळकवला आहे, त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (सुप्रिया सुळेंनी मोडला पवारांचा नियम, मटण खाऊन मंदिरात गेल्याचा शिवसेनेचा आरोप) उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त सर्वत्र ठाकरे गटाचे बॅनर लागलेले असतानाच रामदास कदम यांच्या नावे लावण्यात आलेला देव माणूस हा बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे, माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांच्या लावलेल्या बॅनरवर राक्षसाचा चेहरा लावला आहे. उद्या होळी त्याचे विसर्जन होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव) दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसेवा उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण जंगी सभा आज खेडमध्ये संध्याकाळी पाच वाजता होत आहे. या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेने कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने रवाना झाले आहे. यावेळी शिवसैनिकांनी कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकात वैभव नाईक यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केल्या. तर 40 आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.