मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रपूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं लंपास

चंद्रपूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोनं लंपास

अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

  • Published by:  sachin Salve
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर (Bank of Maharashtra Warora Chandrapur) धाडसी दरोडा (robbery) टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने (Gold) लंपास केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्थानिक नागरिकांन महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली. त्यामुळे गावकऱ्यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली. गायत्री मंत्राच्या जपामुळे Covid-19 बरा होईल का? शास्त्रज्ञांनी सुरू केला अभ्यास पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. तसंच या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडून असल्याचे दिसून आले. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली. रणबीर-आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा विरोध; समोर आलं हे कारण... दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान कामाला लावण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. दरोडेखोरांना माग काढण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
First published:

Tags: Attack, Bank, Chandrapur, Maharashtra, Mumbai, Robbery, Theft, चंद्रपूर

पुढील बातम्या