मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रणबीर-आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा विरोध; समोर आलं हे कारण...

रणबीर-आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा विरोध; समोर आलं हे कारण...

त्यांच्या लग्नात आलियाचे वडिल महेश भट्ट एखाद्या विलनची भूमिका निभावत आहेत. आलियानं कधीही लग्न करु नये. आयुष्यभर तिनं त्यांच्यासोबतच राहावं असं त्यांना वाटतं.

त्यांच्या लग्नात आलियाचे वडिल महेश भट्ट एखाद्या विलनची भूमिका निभावत आहेत. आलियानं कधीही लग्न करु नये. आयुष्यभर तिनं त्यांच्यासोबतच राहावं असं त्यांना वाटतं.

त्यांच्या लग्नात आलियाचे वडिल महेश भट्ट एखाद्या विलनची भूमिका निभावत आहेत. आलियानं कधीही लग्न करु नये. आयुष्यभर तिनं त्यांच्यासोबतच राहावं असं त्यांना वाटतं.

मुंबई 20 मार्च: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) डेट करत आहे. त्यामुळं लवकरच ते दोघं लग्न करणार अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या लग्नात आलियाचे वडिल महेश भट्ट एखाद्या विलनची भूमिका निभावत आहेत. आलियानं कधीही लग्न करु नये. आयुष्यभर तिनं त्यांच्यासोबतच राहावं असं त्यांना वाटतं. त्यामुळं वारंवार महेश भट्ट (Mahesh Bhatt) त्यांच्या लग्नाला विरोध करत आहेत.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं महेश भट्ट्ट यांच्या या विचारामागिल खरं कारण सांगितलं. ती म्हणाली, “माझे वडिल माझी खूप काळजी घेतात. चित्रीकरणाच्या निमित्तानं मी बाहेर गेले तरी रोज मला फोन करतात. मी सतत त्यांच्या डोळ्यांसमोर राहावं असं त्यांना वाटतं. बाहेर गेलीस तर तुला मी बाथरुममध्ये बंद करुन ठेवेन असंही अनेकदा गंमतीनं धमकावतात. मी कधीच लग्न करु नये असं त्यांना वाटतं. कारण मी त्यांच्यापासून दूर जाईन अन् हा धक्का ते पचवू शकतील की नाही याची भीती त्यांना सतावते. त्यामुळं माझ्या लग्नासाठी त्यांचा विरोध आहे.” आलिया सध्या रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची चर्चा आहे.

अवश्य पाहा - ग्लॅमरस अभिनेत्री शेतात चालवतेय नांगर; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम

आलियानं 2013 मध्ये कॉफी विथ करणच्या एका भागात म्हटलं होतं, की तिला रणबीर तेव्हापासून आवडायचा जेव्हा ती अकरा वर्षाची होती. आलियानं रणबीरला ‘ब्लॅक’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं. यावेळी रणबीर संजय लिला भन्साळी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. आलिया आणि रणबीरची प्रेमकथा 2018 मध्ये ब्रह्मास्त्रच्या सेटवर सुरू झाली. याआधी अभिनेता कॅटरिना कैफला (Katrina Kaif) डेट करत होता. दोघंही पहिल्यांदा एक कपल म्हणून सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) लग्नात एकत्र आले होते. यानंतर अनेकदा हे कपल एकमेकांसोबत फिरताना दिसलं. नुकतंच आलिया आणि रणबीरनं नवीन वर्षाचं स्वागतही आपल्या संपूर्ण कुटुंबासह केलं.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Katrina kaif, Love, Mahesh bhatt, Marriage, Open marriage, Ranbir kapoor, Relationship, Sonam Kapoor