मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) आज (दि.03) पार पडली. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने (shinde sarkar) बहुमताचा आकडा पार केला. दरम्यान शिवसेना (shiv sena) आमदारांनी राजन साळवी (mla rajan salavi) यांना मतदान करण्यासाठी शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला होता. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचा व्हीप मोडला हे रेकॉर्डवर येण्यासाठी सुनील प्रभू यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्षांना (assembly election) पत्र दिले होते. मात्र, मतदानाच्या प्रक्रियेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) शिवसेनेच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले. थोरात यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांच्याकडे सेनेचे ते पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली आणि ती मान्य झाली.
सपा आणि एमआयएमच्या आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर मतदान बाळासाहेब थोरात बोलायला उभे राहिले. थोरात यांनी मतदानाची प्रक्रिया अध्यक्षपदाकरीता सुरु आहे. अध्यक्ष महोदय यामध्ये शिवसेनेच्या गटनेत्यांनी आपल्या करता जे पत्र दिलंय त्याची वाचन करावे, त्याची नोंद घ्यावी ते रेकॉर्डवर घ्यावे अशी मागणी केल्याने सभागृहाचे सर्व लक्ष लागले होते.
हे ही वाचा : Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड
बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनुसार नरहरी झिरवळ यांनी पुढील प्रक्रिया पार पडली. आज माझ्यासमोर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष निवडीची कार्यवाही झाली. मतदानाच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले, असे माझ्या निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया माझ्यासमोर झाली आहे. माझ्यासमोर मतदानाची प्रक्रिया झाली असून पुढील शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचं सिद्ध झालं आहे. या सर्वांचे पक्षाविरोधातील मतदान रेकॉर्डवर घेण्यात यावे आणि त्यांची नाव लिहिण्यात यावीत, या सर्वाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. हे रेकॉर्डवर घ्यावे, असे आदेश देत असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
हे ही वाचा : 'वडिलकीचा सल्ला देतो..फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका', माजी आमदाराचं एकनाथ शिंदेंना पत्र
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली आहे. शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, Assembly session, Balasaheb thorat, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)