मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray resigns) मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे (eknath shinde) सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विश्वासदर्शक ठरावावर वक्तव्य केले आहे. त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर केल्याने काँग्रेसचा कुठेही विरोध नसल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, आज आमचे सर्व आमदार विश्वासदर्शक ठरावासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुढच्या रणनीतीवर आमची आज बैठक होणार आहे त्यामध्ये आम्ही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबत काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट...
राष्ट्रवादीला मिळणार विरोधी पक्षनेते पद?
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे (eknath shinde) सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. दरम्यान दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांसाठी (Leader of the Opposition in the Assembly) आज एनसीपीची (ncp meeting) बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार (ajit pawar) किंवा जयंत पाटील (jayant patil) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा (congress leader) जास्त आमदार असल्याने एनसीपीला (ncp) विरोधी पक्षनेते पद मिळणार असल्याचे चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करणार आहेत. शिंदे यांच्यासह आमदार आज मुंबई येथे दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात दाखल झाले होते.
हे ही वाचा : opposition leader : अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?
आपल्या बंडखोर आमदारांसह शिंदे ताज हॉटेलवर मुक्कामी आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट आता मवाळ झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची ताज रेसिडेंसी हॅाटेलमथ्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Uddhav Thackeray (Politician), Young Congress