जाहिरात
मराठी बातम्या / देश / पालिकेचा असंवेदनशीलपणा! Tax भरला नाही म्हणून घरासमोर टाकला कचरा, धक्क्यानं महिलेचा मृत्यू

पालिकेचा असंवेदनशीलपणा! Tax भरला नाही म्हणून घरासमोर टाकला कचरा, धक्क्यानं महिलेचा मृत्यू

पालिकेचा असंवेदनशीलपणा! Tax भरला नाही म्हणून घरासमोर टाकला कचरा, धक्क्यानं महिलेचा मृत्यू

पालिकेनं घरासमोर कचरा फेकल्याच्या धक्क्याने 58 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेनं प्रॉपर्टी टॅक्स (Property Tax) भरला नव्हता. त्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

**हैदराबाद, 21 डिसेंबर :**आपल्याला आपल्या घरात आजूबाजूला कुणी कचरा टाकलेला किंवा केलेला आवडत नाही. कुणी आपल्या घराबाहेर कचरा केला तर आपला संताप होतो. मात्र इथे तर चक्क पालिका प्रशासनानं एका महिलेच्या घराबाहेर कचऱ्याचा ढिग आणून ओतला आणि त्याच धस्का घेऊन एका महिला मृत्यू झाला आहे. पालिकेनं घरासमोर कचरा फेकल्याच्या धक्क्याने 58 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार तेलंगणा (Telangana) राज्यातील नारायण खेडा जिल्ह्यात झाला आहे. या महिलेनं प्रॉपर्टी टॅक्स (Property Tax) भरला नव्हता. त्यामुळे पालिकेनं त्यांच्या घरासमोर सर्व कचरा फेकला होता. तेलंगणामध्ये टीबी पेशंट महिलेवर हॉस्पिटलने उपचार नाकारल्याने बसच्या रांगेत मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे आणखी एक मृत्यू झाला आहे. काय आहे प्रकरण? भुवाम्मा असे या प्रकरणात मृत्यू पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत असलेल्या मुदतीमध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरला नव्हता. त्यामुळे पालिकेनं त्यांच्या घरासमोर सर्व कचरा आणून टाकला. 15 डिसेंबरला घरासमोर टाकलेला कचरा पालिकेनं 17 डिसेंबर रोजी हटवला. ‘पालिकेच्या कारवाईचा भुवाम्मा यांना मोठा धक्का बसला. हा अपमान सहन झाला नाही म्हणूनच त्यांचा मृत्यू झाला’, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे वाचा- राजधानी पुन्हा हादरली, 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक भुवाम्माची तब्येत शनिवारी बिघडली. त्यामुळे त्यांना संगारेड्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये रविवारी उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘भुवाम्मा या अस्थमाच्या पेशंट होत्या. तसेच त्यांना वेगवेगळे आजार होते’, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: telangana
  • First Published :
जाहिरात
जाहिरात