जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? पुन्हा व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? पुन्हा व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू

बच्चू कडू यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाबद्दल विधान केलं होतं. पुढच्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री असेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा तशाच प्रकारचं विधान केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 16 सप्टेंबर : प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाबद्दल विधान केलं होतं. पुढच्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री असेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा तशाच प्रकारचं विधान केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण त्यामध्ये बच्चू कडू यांचं नाव आलं नाही म्हणून ते नाराज आहेत, अशी चर्चा होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात बच्चू कडू यांचं नाव येईल, अशी चर्चा आहे. त्याबद्दल बच्चू कडू यांनी विधान केलं आहेच, पण त्याआधी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. “प्रहारचे आज दहा आमदार असते तर परिस्थिती थोडी बदलली असती. प्रहारचे दहा आमदार असते तर येणारा मुख्यमंत्री प्रहारचा असता”, असं बच्चू कडू स्पष्ट म्हणाले. “येत्या निवडणूकांमध्ये प्रहारचे 15 उमेदवार उभे करू. त्यापैकी 10 तरी निवडून आणू. आम्ही सत्तेजवळ जाणार नाही. पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल”, असं बच्चू कडू म्हणाले.

जाहिरात

( नवाब मलिक बाहेर, आव्हाडांचं प्रमोशन, शरद पवारांच्या ‘टीम राष्ट्रवादी’ची घोषणा! ) “आम्ही राजकारणी लोक आहोत. राजकारण करावं लागतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची काय अवस्था हे आपल्याला माहिती आहे. राजू शेट्टी एकटेच राहीले. त्यामुळे कार्यकर्ते टिकून राहण्यासाठी काही खेळी करावी लागते”, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं. खरंतर बच्चू कडू गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते. त्यांनी आज अमरावतीत बोलताना मंत्रिपदावरुन महत्वाची प्रतिक्रिया दिली. “आमच्यासाठी मंत्रीपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रीपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्या बाहेरचा विषय आहे”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात