जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवाब मलिक बाहेर, आव्हाडांचं प्रमोशन, शरद पवारांच्या 'टीम राष्ट्रवादी'ची घोषणा!

नवाब मलिक बाहेर, आव्हाडांचं प्रमोशन, शरद पवारांच्या 'टीम राष्ट्रवादी'ची घोषणा!

NCP National Committe

NCP National Committe

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचं प्रमोशन झालं आहे, तर नवाब मलिक यांना डच्चू देण्यात आला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं 10 आणि 11 सप्टेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पक्षातली कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले, त्यानंतर शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांना प्रमोशन मिळालं आहे, जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. तर नवाब मलिक यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं आहे. मलिक आणि आव्हाड हे दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल तर मुख्य जनरल सेक्रेटरीपदी सुनिल तटकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे यांना घेण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्यामुळे सुनिल तटकरे यांची पक्षाच्या मुख्य जनरल सेक्रेटरीपदी नेमणूक करण्यात आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात