अमरावती 03 नोव्हेंबर : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमधील वाद मिटण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यातच आमदार रवी राणांच्या एका विधानामुळे आता हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. ‘कुणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याचीदेखील हिंमत आहे,’ असा इशारा राणा यांनी बच्चू कडू यांना दिला होता. यामुळे आता बच्चू कडू पुन्हा नाराज झाले आहेत. प्रताप सरनाईकांना मोठा धक्का, ईडीने बरोबर केली 11.35 कोटींची संपत्ती जप्त आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आमदार बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बच्चू कडूंनी राणा यांच्या या वक्त्यव्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. आता बच्चू कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहेत. आमच्यासाठी हा वाद संपला असल्याचं आमदार कडू यांनी काल स्पष्ट केलं होतं. यासोबतच कार्यकर्त्यांनी या वादावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मात्र, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना घरात घसून मारण्याचं वक्तव्य केलं. यामुळे बच्चू कडू पुन्हा नाराज झाले आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. ‘गुलाबराव पाटलांच्या कारकिर्दीत मोठा घोटाळा…’ शिंदे गटाच्या मंत्र्यावर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी राणा यांच्या या विधानावर प्रतिक्रियाही दिली होती. रवी राणा यांना मला मारायचं असेल तर मी 5 तारखेला घरी आहे. तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावं. मी मार खायला तयार आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते. यासोबतच मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन, असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं समोर येत आहे. आता या भेटीत नेमकं काय घडतं? आणि हा वाद आता तरी थांबणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.